शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

आॅलिम्पियन सायकलपटू चालवितो रिक्षा!

By admin | Updated: August 4, 2016 04:00 IST

काही दशकांपूर्वी सायकलिंगमध्ये वर्चस्व गाजवीत अनेक चकाकते चषक त्याने उंचावले.

लाहोर : काही दशकांपूर्वी सायकलिंगमध्ये वर्चस्व गाजवीत अनेक चकाकते चषक त्याने उंचावले. पाकिस्तानात त्याच्या नावाचा जयजयकार व्हायचा. वृद्धापकाळात मात्र त्याच्या वाट्याला उपेक्षिताचे जगणे आले आहे. ८१ वर्षांच्या या आॅलिम्पिकपटूने स्वत:ची व्यथा ऐकविली तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. दोन वेळेच्या उपजीविकेसाठी आज हा माजी खेळाडू लाहोरच्या गल्लीबोळात रिक्षा ओढतो आहे. मोहम्मद आशिक त्याचे नाव! तो म्हणतो, ‘‘मी त्या वेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक मुख्य कार्यकारी यांचेशी हस्तांदोलन केले. सर्व जण मला विसरले. असे का घडावे, याचा विचार मनात येतो तेव्हा स्वत:वरील विश्वास उडाल्याची जाणीव होते.’’ १९६० आणि १९६४ च्या आॅलिम्पिकमध्ये सायकलपटू म्हणून सहभागी झालेला आशिक आता रिक्षा ओढत आहे. सायकलिंगमधील करिअर संपल्यानंतर नशिबानेदेखील आशिकला दगा दिला. त्याने जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी केली, पण १९७७ साली तब्येत खराब होताच ती नोकरी गमवावी लागली. त्यानंतर टॅक्सी आणि व्हॅन चालविली. पण, कौटुंबिक स्थिती इतकी खालावली की रिक्षा चालवून संसाराचा गाडा ओढणे भाग पडले. कुटुंबासोबत साडेचारशे चौरस फूट घरात राहणाऱ्या आशिकची कमाई दरदिवशी चारशे रुपये आहे. पत्नीचे निधन झाले. चारही मुले त्याच्यापासून वेगळी राहतात. आशिक आधी आपली सर्व पदके रिक्षावर लावत असे. आता सर्व पदके घरीच पेटीत ठेवली. आशिकने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती केल्विन कुलिज यांचे प्रसिद्ध वाक्य पाठ केले आहे. तो म्हणतो, ‘आपल्या नायकांना विसरणारा देश कधीही प्रगती करू शकत नाही.’ त्याच्या वेदना इतक्या तीव्र होतात की आशिक बोलून जातो,‘ गरिबांनी कधीही खेळात भाग घेऊ नये.’! तो पुढे म्हणाला,‘एकदा माझी पत्नी रडायला लागली तेव्हा मी तिला कारण विचारले. ती माझ्या तब्येतीबद्दल चिंतेत होती. मी तिला म्हटले, आनंदी राहा, जे आपल्याला विसरले त्यांना विसरण्याचा प्रयत्न कर. माझ्या सांगण्यानंतर ती आनंदी राहायची. नंतर थोड्याच दिवसांनी ती मला सोडून गेली. मीदेखील रोज मरण येण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करतो. (वृत्तसंस्था)