शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बेलची वन डेतून निवृत्ती

By admin | Updated: August 30, 2015 02:35 IST

इंग्लंडचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज इयान बेल याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तथापि, कसोटी क्रिकेट खेळण्याची भूक अद्यापही बाकी असल्याचे त्याने म्हटले आहे.

लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज इयान बेल याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तथापि, कसोटी क्रिकेट खेळण्याची भूक अद्यापही बाकी असल्याचे त्याने म्हटले आहे.३३ वर्षीय बेलने आॅस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेज मालिका जिंकल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते; परंतु संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस आणि कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक यांच्याशी चर्चा केल्यानंतर बेलने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.बेल म्हणाला, ‘‘अ‍ॅशेज एक महत्त्वपूर्ण मालिका आहे आणि प्रत्येक अ‍ॅशेज मालिका संपल्यानंतर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवतो. मी ओव्हल कसोटीनंतर प्रशिक्षक बेलिस आणि कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक यांच्याशी या संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली होती. मी माझा विचार त्यांच्यासमोर प्रामाणिकपणे ठेवला होता. निवृत्ती घेण्याचा एक खूपच कठीण निर्णय होता. मी याविषयी खोलवर विचार केला. माझ्यात अद्यापही धावा करण्याची भूक आहे आणि मला वाटते मी अजूनही कसोटी क्रिकेट खेळ सुरू ठेवू शकतो.’’मधल्या फळीतील या विश्वसनीय फलंदाजाने इंग्लंडकडून वन डेत सर्वात जास्त धावा केल्या आहेत. त्याने १६१ वन डेत चार शतकांसह ५ हजार ४१६ धावा केल्या आहेत. याशिवाय ११५ कसोटी सामने खेळताना २२ शतकांसह जवळपास ४३ च्या सरासरीने ७ हजार ५६९ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून फक्त चार फलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)