नवी दिल्ली :श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघव्यवस्थापनाने सीनिअर फलंदाज सुरेश रैना याला रविवारी खेळल्या जाणा:या पाचव्या व अखेरच्या सामन्यात विश्रंती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, ‘रविवारी होणा:या लढतीत सुरेश रैना खेळणार नाही. त्याला विश्रंती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध राहतील.’
रैनाच्या अनुपस्थितीत भारतीय संघात 13 खेळाडू राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधवला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगर पुढे म्हणाला, ‘ज्या खेळाडूंना अद्याप खेळण्याची संधी मिळाली नाही त्या खेळाडूंना रविवारच्या लढतीत संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्व खेळाडूंना संधी देण्याची योजना आहे.’ जाधवने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करताना 5क् धावा चोपल्या होत्या.