नवी दिल्ली : स्टार बॉक्सर विजेंदर सिंगच्या ‘चायनीज माल’च्या टिपणीवर त्याचा प्रतिस्पर्धी जुल्फिकार मैमतअलीने प्रत्युत्तर दिले. ‘बॅटलग्राऊंड आशिया’या नावाने होणा-या लढतीपूर्वी उभय खेळाडूंदरम्यान वाक्युद्ध रंगले आहे.विजेंदरच्या टिपणीवर बोलताना मैमतअली म्हणाला, ‘चिनी लोक काय करू शकतात, हे दाखविण्यास मी उत्सुक आहे. चीन काय करू शकतो, हे आम्ही भारताला वारंवार दाखविले आहे. विजेंदरलाही धडा शिकविण्याची वेळ आली आहे.’शनिवारी ५ आॅगस्ट रोजी मुंबईत खेळल्या जाणा-या लढतीपूर्वी मैमतअलीने म्हटले की, ‘मी तुझ्या घरी येत आहे विजेंदर. ५ आॅगस्ट रोजी मी तुझा बेल्ट सोबत घेऊन जाईल. मी सुरुवातीच्या फे-यांमध्ये तुला नॉकआऊट करेल.’मैमतअली पुढे म्हणाला, ‘या लढतीसाठी मी सज्ज आहे. माझ्या कारकिर्दीतील ही प्रतिष्ठेची लढत आहे. माझ्याविरुद्ध त्याला संधी असेल असे मला वाटत नाही. त्याला वाटते की मी ‘बच्चा’ आहे, पण मी त्याला दाखवून देईल.’ (वृत्तसंस्था)
जुल्फिकार मैमतअलीचे विजेंदर सिंगला प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:25 IST