शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

मँचेस्टरची पारंपरिक प्रतिस्पर्धी लिव्हरपूलविरुद्ध खरी कसोटी

By admin | Updated: January 15, 2017 04:35 IST

सातत्यपूर्ण कामगिरीने सध्या प्रकाशझोतात असलेला मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार अँदेर हेरिराने लक्ष वेधले आहे. स्पेनचा हा एकमेव खेळाडू मँचेस्टरच्या यादीत असून त्याच्या

- अँदेर हेरिराशी बातचीत..सातत्यपूर्ण कामगिरीने सध्या प्रकाशझोतात असलेला मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार अँदेर हेरिराने लक्ष वेधले आहे. स्पेनचा हा एकमेव खेळाडू मँचेस्टरच्या यादीत असून त्याच्या प्रतिनिधित्वात त्यांनी ९ विजय गोल नोंदवले आहेत. मँचेस्टरची आता त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी लिव्हरपूलविरुद्ध कसोटी असेल. मॉरोन्होची टीम यंदाच्या सत्रात आपला विक्रम राखणार काय, असा प्रश्न आहे. याबद्दल त्यांचा मिडफिल्डर अँदेर हेरिराशी साधलेला हा संवाद...एकंदरीत नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली? २०१७ हे मँचेस्टरचे वर्ष असेल?- आशा करूया. मी खूप आशावादी आहे. कारण आम्ही सध्या चांगल्या ‘स्टेज’मध्ये आहोत. आम्ही विजयाचे हकदारही आहोत. खूप मेहनत घेत आहोत आणि चांगलेही भासते.लिव्हरपूल हा तगडा प्रतिस्पर्धी. काही दबाव? तुम्ही त्यांना बरोबरीवरही रोखले होते. मात्र, जुर्जेन क्लोपच्या नेतृत्वाखाली संघ चांगल्या लयीत आहे. त्यांच्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधलाय?- म्हणूनच मी येथे आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध ६-७ वेळा खेळलोय. चार वेळा जिंकलोय. हेच एक चांगले उदाहरण असेल की आम्ही कसे खेळलो आणि त्यांच्याविरुद्ध कसे खेळायला हवे. सध्या ते सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, असे असताना आव्हानांना सहज घेता कामा नये. आम्हाला ताकदीने खेळावे लागेल.मँचेस्टर युनायटेड संघात लिव्हरपूलप्रमाणे आव्हान झेलणारे पुरेस खेळाडू आहेत, असे तुला वाटते काय?- मोठी ताकद आहे. खेळ म्हटला म्हणजे काहीतरी चमत्कारी गोष्ट घडाव्या लागतात. काहीजण काही क्षणात खेळ बदलून टाकतात. इब्राहोमोव्हीकसारखे रुनी, जुआन माटा, अ‍ॅन्थोनी मार्शियल हे आघाडीचे खेळाडू सामना बदलून टाकतात. जर त्यांनी साजेशा खेळ केला नाही तर निकाल काही वेगळाही लागू शकतो. चांगली बातमी अशी आहे की, युनायटेडचे बरेच खेळाडू हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पॉल पोग्बासह तू पण चांगला खेळतोस. त्याच्याबद्दल काय सांगशील?- त्याच्यासोबत खेळताना आनंद वाटतोय. पोग्बा हा मिडफिल्डर असून त्याच्याकडे सर्व क्वालिटी आहेत. जेव्हा तुम्ही मिडफिल्डर असता तेव्हा तुमच्याकडे सर्वच गुण नसतात, पण त्याच्याकडे सर्वच गुण आहेत. तो शॉट, हेड आणि बचाव अप्रतिमपणे करू शकतो. त्याच्यासाठी काही सूचना. की आगामी काळात तो अधिक सुधारणा करेल?- मला तसे वाटते. सध्या तो चांगल्या लयीत आहे. पण, आम्ही अधिक आशावादी आहोत. कारण तो अधिक सुधारू शकतो. त्यालाही जगातील सर्वाेत्तम खेळाडू व्हायला आवडेल. मार्कुस रशफोर्डबद्दल? तो सुद्धा याच सत्रात आला आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून आलेल्या या खेळाडूकडूनही मोठ्या आशा आहेत. त्याबद्दल काय सांगशाील?- मार्कुसबाबत काही घाई नको. २० वर्षांखालील असलेला हा खेळाडू टॅलेंटेड आहे. प्रत्येक सामन्यात त्याने गोल नोंदवावा, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. बचाव आणि आक्रमकता याबाबत मलाही तो खूप आवडतो. युवा खेळाडू असून तो आमच्यातील एक महत्त्वाचा खेळाडू असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.(पीएमजी)