शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज

By admin | Updated: June 30, 2016 05:51 IST

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे.

बंगळुरू : कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे. त्यादृष्टीने युवा खेळाडूंमधून कसोटीपटू घडविणे आपल्यापुढील अवघड आव्हान असेल, असे मत नवनियुक्त कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.वर्षभरासाठी कोचपद स्वीकारल्यानंतर बुधवारी बोलाविलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत कुंबळे म्हणाले, ‘‘कसोटी क्रिकेट भक्कम करण्यास माझे प्राधान्य असेल. जे खेळाडू गेल्या काही महिन्यांत अनेक टी-२० सामने खेळले, त्यांना कसोटीसाठी तयार करणे हे माझ्यापुढील मोठे आव्हान असेल. चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळविणे माझ्याइतकीच भारतीय संघाची जबाबदारी असेल. हा प्रकार अधिक रोमहर्षक झाल्यास चाहते कसोटी क्रिकेटकडे परततील.’’कुंबळेंची पहिली असाईनमेंट वेस्ट इंडिज दौरा ही आहे. या दौऱ्यात भारतीय संघ मालिका जिंकेल, असा आशावाद व्यक्त करीत कुंबळे म्हणाले, ‘‘विंडीज दौऱ्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विंडीजमधील खेळपट्ट्या भारतासारख्याच आहेत. विंडीज संघ मर्यादित षटकांच्या सामन्यात भक्कम असला तरी आम्ही कसोटीत त्यांना पराभूत करू, अशी आशा आहे. कसोटी मालिका विजय हे आमचे ‘टार्गेट’ राहील.’’भारतीय संघातील चार खेळाडू आधी विंडीज दौऱ्यावर गेले आहेत. याशिवाय अनेक जण भारतीय अ संघातून विंडीजमध्ये खेळले. प्रतिभावान खेळाडू दौऱ्यात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करतील, इतके सांगू शकतो. ईशांत शर्मा, मुरली विजय, विराट कोहली, लेगस्पिनर अमित मिश्रा या सर्वांनी प्रभावी कामगिरी केली होती. संघाचे सहा दिवसांचे तयारी शिबिर जोरात सुरू आहे. सध्या वेगवान गोलंदाजी कोच नसल्याने गोलंदाजांसाठी स्वत: वेगळे शिबिर आयोजिण्याची तयारी ‘जम्बो’ने दाखविली. कुंबळे आठ वर्षांनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परतले आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘मी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या दोन्ही कर्णधारांसोबत चर्चा केली. आम्ही जिंको अथवा हरो, पण कर्णधारांना माझा संपूर्ण पाठिंबा राहील. सर्वच खेळाडूंमध्ये क्षमता असल्याने मी पडद्यामागून सर्वांना ताकद देणार आहे. ज्या संघासोबत मी खेळलो तेव्हाचा संघ आणि सध्याचा संघ यात कमालीची तफावत आहे. सध्याच्या टीममधील खेळाडूंचे वय सरासरी २५ आहे. फिल्डिंगमध्ये सध्याच्या संघात प्रतिभावान खेळाडू असून हे खेळाडू अष्टपैलू कामगिरी करू शकतात. युवा खेळाडूंनी लहान वयात बरेच काही मिळविले. विराटकडे ४०, तर ईशांतकडे ६० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये मी स्वत: युवा खेळाडूंसोबत वेळ घालविला असल्याने दडपणात कसा संयम पाळायचा याचे धडे देणार आहे.’’(वृत्तसंस्था)