शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

आरसीएफचा दणदणीत विजय

By admin | Updated: February 3, 2015 01:55 IST

राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टीलायझर (आरसीएफ) संघाने सचिन पास्टेच्या अप्रतिम खेळाच्या बळावर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमवर (बीपीसीएल) ३६-२५ असा दणदणीत विजय साजरा केला.

मुंबई : राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टीलायझर (आरसीएफ) संघाने सचिन पास्टेच्या अप्रतिम खेळाच्या बळावर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमवर (बीपीसीएल) ३६-२५ असा दणदणीत विजय साजरा केला. काशिलिंग अडके, विशाल माने आणि रिशांक देवाडिगा या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या आरसीएची मदार सचिनने समर्थपणे पेलली आणि एकाकी झुंज देत बाजी मारली. मध्यांतरापर्यंत आरसीएफकडे असलेली १६-१४ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी सचिनच्या आक्रमक खेळाने वाढवली आणि आरसीएफला ११ गुणांनी विजय मिळवून दिला. बीपीसीएल आणि आरसीएफ यांच्यातील लढत सुरुवातीपासून चुरशीची दिसत होती. जितेश जोशी याने एकाच चढाईत आरसीएफच्या चार बचावपटूंना बाद करून आघाडी मिळवली. मात्र, आरसीएफच्या सचिनने सडेतोड उत्तर देत चढाईत तीन गडी टिपून सामन्यात चुरस निर्माण केली. सचिनने हाच खेळ पुढेही कायम राखल्यामुळे आरसीएफने प्रतिस्पर्धी संघावर दोन लोण चढवून विजय निश्चित केला. सचिनला सुदेश कुळे, शरद पवार आणि अमर निवाते यांनी अप्रतिम साथ दिली. बीपीसीएलकडून दीपचंद सिंग आणि नीलेश शिंदे यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले.पुरुष गटाच्या दुसऱ्या लढतीत एअर इंडियाने ३५-२६ अशा फरकाने स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया, कांदिवली (साई) संघाचा पराभव करून आगेकूच केली. सचिन पाटील आणि कृष्णा यांना बचावपटू मनोजकडून चांगली साथ मिळाली. साईकडून कृष्णा मदने व आशिष गव्हाणे यांनी कडवी टक्कर दिली. इतर समन्यात महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने ४०-१७ अशा फरकाने रेल्वे पोलिसांचा धुव्वा उडविला. (क्रीडा प्रतिनिधी)