शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

‘आरसीबी’चा शेवट गोड

By admin | Updated: May 15, 2017 01:35 IST

यंदाच्या सत्रात अत्यंत खराब कामगिरी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला १० धावांनी नमवून आयपीएल - १० चा शेवट गोड केला.

नवी दिल्ली : यंदाच्या सत्रात अत्यंत खराब कामगिरी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला १० धावांनी नमवून आयपीएल - १० चा शेवट गोड केला. या विजयानंतरही आरसीबी गुणतालिकेत तळाला राहिले. याआधी दोन्ही संघांचे स्पर्धेचे आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिक म्हणून राहिला होता.फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी निर्धारित षटकांत ६ बाद १६१ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकरांना १५१ धावांवर बाद करून आरसीबीने विजय मिळवला. पवन नेगी (३/१०) आणि हर्षल पटेल (३/४३) यांनी अचूक मारा करून दिल्लीकरांना जखडवून ठेवले. ऋषभ पंत (४५) व श्रेयस अय्यर (३२) यांनी दिल्लीच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, दोघेही बाद झाल्यानंतर आरसीबीने पकड मिळवली.तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीचे (४५ चेंडूंत ५८ धावा) शानदार अर्धशतक आणि ख्रिस गेलची (३८ चेंडूंत ४८) फटकेबाजी या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. कोणत्याही दडपणाशिवाय खेळताना गेलने आक्रमक सुरुवात केली. परंतु, विष्णू विनोद झटपट परतल्यानंतर त्याने काहीसा सावध पवित्रा घेत कोहलीला अधिक स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. जम बसल्यावर मात्र त्याने काही अप्रतिम फटके मारले. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने आरसीबीची मजल मर्यादित राहिली. संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ६ बाद १६१ धावा (विराट कोहली ५८, ख्रिस गेल ४८; पॅट कमिन्स २/२१) वि. वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत सर्व बाद १५१ धावा (ऋषभ पंत ४५, श्रेयस अय्यर ३२; पवन नेगी ३/१०, हर्षल पटेल ३/४३).