शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीला आता विजय हवाच

By admin | Updated: April 27, 2017 17:48 IST

एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत सापडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पुढील

ऑनलाइन लोकमतबेंगळुरु, दि. 27 -  एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत सापडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पुढील वाटचालीसाठी उर्वरित सहापैकी प्रत्येक सामना जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आज गुजरात लायन्सविरुद्ध त्यांना विजय मिळवावाच लागेल. आरसीबी ‘प्ले आॅफ’च्या दौडमधून बाहेर पडणार नाही, याची काळजी त्यांच्या फलंदाजांना घ्यावीच लागेल. कारण फलंदाजीने त्यांना धोका दिला आहे. कर्णधार विराट कोहलीने चार सामन्यात १५४, ख्रिस गेलने पाच सामन्यात १४४ आणि डिव्हिलियर्सने चार सामन्यात केवळ १४५ धावा केल्या आहेत. कोहली अ‍ॅन्ड कंपनीला बाद फेरी गाठण्याची अद्यापही संधी आहे. गुजरात लायन्स संघ फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यांच्यावर विजय नोंदविण्यासोबतच अन्य पाच सामने जिंकून कामगिरी सुधारायची झाल्यास फलंदाजांना शंभर टक्के योगदान द्यावे लागेल. लायन्सचे सात सामन्यात चार गुण आहेत. या संघाची फलंदाजी तितकी प्रभावी ठरलेली नाही. आघाडीचे फलंदाज अधूनमधून मात्र चमकले. जखमी ड्वेन ब्राव्होऐवजी संघात आलेला इरफान पठाण हा अंतिम एकादशमध्ये खेळेल का, हे पाहणे रंजक ठरेल. १०२ आयपीएल सामने खेळलेल्या इरफानच्या ११३७ धावा आणि १०२ बळी आहेत. यंदा इरफानला लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. मागच्या सामन्यात गुजरातने केकेआरवर विजय नोंदविला होता. तेच डावपेच आरसीबीविरुद्ध वापरण्याची कर्णधार सुरेश रैनाची इच्छा असेल. रैनावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. ब्रँडन मॅक्यूलम, अ‍ॅरोन फिंच यांच्याकडूनही धावांची अपेक्षा राहील.गोलंदाजी ही गुजरातसाठी मुख्य समस्या ठरते. या संघाच्या गोलंदाजांनी सहा सामन्यात केवळ २६ गडी बाद केले. हॅट्ट्रिक घेणारा अ‍ॅण्ड्र्यू टाय पूर्णपणे फिट नाही तर रवींद्र जडेजा अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश्ी ठरला. प्रवीण कुमारचा मारा काहीसा बोथट झाला आहे. केवळ बासिल थम्बी याचा वेगवान मारा आतापर्यंत प्रभावी जाणवला. (वृत्तसंस्था)