शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

आरसीबी-केकेआर लढत आज

By admin | Updated: May 16, 2016 04:22 IST

कोलकाता नाईट रायडर्स संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

कोलकाता : इंडियन प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वात प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेला माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. केकेआर संघाला गुणसंख्या १६ करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. त्यामुळे त्यांचा अंतिम चार संघांतील प्रवेश निश्चित होणार आहे. उभय संघांना अद्याप तीन सामने खेळायचे आहेत. सोमवारी विजय मिळवत गुणतालिकेतील आपल्या स्थानामध्ये सुधारणा करण्यास उभय संघ उत्सुक आहेत. बॅँगलोर संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स शानदार फॉर्मात आहे. या दोघांनी शनिवारच्या लढतीत शतकी खेळी केली. या दोघांचा फॉर्म बघता गौतम गंभीरची फिरकीपटूंना संधी देण्याची रणनीती ‘फेल’ठरू शकते. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर गंभीर द. आफ्रिकन फलंदाज डिव्हिलियर्सला रोखण्यास प्रयत्नशील आहे. बॅँगलोरचा कर्णधार विराट कोहली ‘मास्टर फिनिशर’ आहे. दडपणाखाली तो शानदार फलंदाजी करतो. या सामन्याच्या निमित्ताने केकेआरची गोलंदाजी व आरसीबीची फलंदाजी यांच्यातील लढत अनुभवण्याची संधी मिळणार आहे. >प्रतिस्पर्धी संघकोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, शकिबुल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नारायण, अंकित राजपूत, मोर्नी मॉर्कल, ख्रिस लिन, कोलिन मुन्रो, ब्रॅड हॉग, शॉन टेट, जेसन होल्डर, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, जयदेव उनादकट आणि राजागोपाल सतीश.रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, लोकेश राहुल, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी, ख्रिस जॉर्डन, श्रीनाथ अरविंद, वरुण अ‍ॅरोन, यजुवेंद्र चाहल, ट्रेव्हिस हेड, केन रिचर्डसन, डेविड विसे, तबरेज शम्सी, अबु नेचिम, प्रवीण दुबे, इकबाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजीत मलिक, मंदीप सिंग, परवेज रसूल, हर्षल पटेल आणि विकास टोकस.