शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीला लायन्सविरुद्ध विजयाची आशा

By admin | Updated: April 27, 2017 00:56 IST

फलंदाजांकडून होत असलेल्या ढिसाळ कामगिरीपाठोपाठ एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत

बेंगळुरु: फलंदाजांकडून होत असलेल्या ढिसाळ कामगिरीपाठोपाठ एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पुढील वाटचालीसाठी उर्वरित सहापैकी प्रत्येक सामना जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. आज गुरुवारी त्यांची गाठ पडेल ती गुजरात लायन्सविरुद्ध.आरसीबी ‘प्ले आॅफ’च्या दौडमधून बाहेर पडणार नाही, याची काळजी त्यांच्या फलंदाजांना घ्यावीच लागेल. काल हैदराबादविरुद्धची लढत पावसात वाहून जाताच आठ सामन्यात दोन विजयातून या संघाकडे केवळ पाच गुण आहेत. केकेआरविरुद्ध हा संघ केवळ ४९ धावांत गारद झाला. ईडनवरील या निचांकी कामगिरीदरम्यान एकही फलंदाज संघाच्या मदतीला धावून आला नव्हता. कर्णधार विराट कोहलीने चार सामन्यात १५४, ख्रिस गेलने पाच सामन्यात १४४ आणि डिव्हिलियर्सने चार सामन्यात केवळ १४५ धावा केल्या आहेत. कोहली अ‍ॅन्ड कंपनीला बाद फेरी गाठण्याची अद्यापही संधी आहे. गुजरात लायन्स संघ फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यांच्यावर विजय नोंदविण्यासोबतच अन्य पाच सामने जिंकून कामगिरी सुधारायची झाल्यास फलंदाजांना शंभर टक्के योगदान द्यावे लागेल. लायन्सचे सात सामन्यात चार गुण आहेत. या संघाची फलंदाजी तितकी प्रभावी ठरलेली नाही. आघाडीचे फलंदाज अधूनमधून मात्र चमकले. जखमी ड्वेन ब्राव्होऐवजी संघात आलेला इरफान पठाण हा अंतिम एकादशमध्ये खेळेल का, हे पाहणे रंजक ठरेल. १०२ आयपीएल सामने खेळलेल्या इरफानच्या ११३७ धावा आणि १०२ बळी आहेत. यंदा इरफानला लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. मागच्या सामन्यात गुजरातने केकेआरवर विजय नोंदविला होता. तेच डावपेच आरसीबीविरुद्ध वापरण्याची कर्णधार सुरेश रैनाची इच्छा असेल. रैनावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. ब्रँडन मॅक्यूलम, अ‍ॅरोन फिंच यांच्याकडूनही धावांची अपेक्षा राहील.गोलंदाजी ही गुजरातसाठी मुख्य समस्या ठरते. या संघाच्या गोलंदाजांनी सहा सामन्यात केवळ २६ गडी बाद केले. हॅट्ट्रिक घेणारा अ‍ॅण्ड्र्यू टाय पूर्णपणे फिट नाही तर रवींद्र जडेजा अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश्ी ठरला. प्रवीण कुमारचा मारा काहीसा बोथट झाला आहे. केवळ बासिल थम्बी याचा वेगवान मारा आतापर्यंत प्रभावी जाणवला. (वृत्तसंस्था)