शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आरसीबीचे गोलंदाज दडपणाखाली

By admin | Updated: May 7, 2016 04:45 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघ अडचणीच्या स्थितीत आहे, पण अद्याप आम्हाला संधी आहे. आतापर्यंतची आमची कामगिरी साधारण राहिली आहे.

एबी डिव्हिलियर्स लिहितो़...आयपीएलच्या नवव्या पर्वात आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघ अडचणीच्या स्थितीत आहे, पण अद्याप आम्हाला संधी आहे. आतापर्यंतची आमची कामगिरी साधारण राहिली आहे. आम्हाला सातपैकी केवळ दोन लढतींमध्ये विजय मिळवता आला. प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आगामी सातपैकी सहा सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. ही अशक्य बाब नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आयपीएलमध्ये यापूर्वीही आम्ही पराभवाचे दष्टचक्र भेदत सलग पाच-सहा सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. पहिले एक आणि त्यानंतर दुसरा याप्रमाणे लढतींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळते. अशाच पद्धतीने एकापाठोपाठ सामने जिंकल्यानंतर लय गवसण्यास मदत मिळते आणि तुम्ही स्पर्धेत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरता. अशा स्थितीत तुम्हाला कुठल्या प्रतिस्पर्ध्याचे भय वाटत नाही आणि प्रत्येक लढतीत वेगळ्या आत्मविश्वासाने सहभागी होता. संघातील माहोल सकारात्मक आहे. आमच्या तंबूत कुठले भय नसून कुणीच एकमेकांवर दोषारोप करीत नाहीत. अशी परिस्थिती होण्यासाठी सर्वंच जबाबदार असल्याची आम्हाला कल्पना आहे. चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारीही आमचीच आहे. आम्हाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आम्ही काही वेळ चांगली कामगिरी केली, पण ४० षटके त्यात सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. कोलकाताविरुद्धच्या लढतीत ३५ षटकापर्यंत आमचे नियंत्रण होते. आम्ही चांगली धावसंख्या उभारली आणि चांगली गोलंदाजीही केली, पण त्यानंतर आम्ही नियंत्रण गमावले आणि अखेरच्या १५ मिनिटांमध्ये सामनाही गमावला. आमची फलंदाजी चांगली आहे, पण गोलंदाजी दडपणाखाली आहे. काय चूक होत आहे, याची गोलंदाजांना कल्पना असून आव्हान म्हणून त्यांनी याचा स्वीकार केला आहे. आगामी सामन्यांमध्ये परिस्थिती बदलण्यासाठी सज्ज आहोत. आमचे क्षेत्ररक्षणही साधारण ठरले आहे. या विभागात प्रत्येक धाव वाचवण्यावर भर देणे आवश्यक आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार असेल तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता येते. कठीण लक्ष्य गाठायचे आहे, याची आम्हाला कल्पना आहे. लक्ष्य साध्य करण्याची क्षमता असलेला संघ आमच्याकडे असून ते साध्य करण्याची पद्धतही आम्हाला ठावुक आहे. (टीसीएम)