शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

खेळपट्टीच्या वेगामुळे आरसीबीचे फलंदाज चकित

By admin | Updated: April 25, 2017 01:03 IST

रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला.

सौरभ गांगुली लिहितात...

रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. त्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया अपेक्षित होती. बेंगळुरूसाठी ही महत्त्वाची लढत होती. या लढतीत गुणांची कमाई करता आली असती तर त्यांना गुणतालिकेतील स्थानामध्ये सुधारणा करण्याची संधी होती. ईडनच्या खेळपट्टीवर १३२ धावांचे लक्ष्य मोठे नव्हते, पण कोलकाताच्या वेगवान गोलंदाजांनी बेंगळुरूला गुडघे टेकविण्यास भाग पाडले. सध्या ईडनगार्डन्सवरील खेळपट्टी देशातील सर्वोत्तम खेळपट्ट्यांपैकी एक आहे. या खेळपट्टीवर प्रत्येकाला आपली प्रतिभा दाखविण्याची संधी असते. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पहिल्या डावात फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांनी वरचष्मा राखला.आयपीएलच्या दहाव्या पर्वातील जवळजवळ अर्धा टप्पा आटोपला आहे. ईडनवरील वातावरण शानदार होते. येथे प्रत्येक तिकीट विकले गेले होते. देशभर आयपीएलच्या लढतींसाठी चाहते मैदानावर गर्दी करीत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये बेंगळुरूच्या यजुवेंद्र चहलसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. राष्ट्रीय संघातर्फे चमकदार कामगिरी केल्यानंतर तो एक दर्जेदार गोलंदाज म्हणून छाप सोडत आहे. नाईट रायडर्सने आक्रमक सुरुवात केली होती, बेंगळुरूचे फिरकीपटू त्यांना रोखण्यात यशस्वी ठरले. स्टेडियममध्ये उपस्थित ७५ टक्के चाहत्यांना पाहुणा आरसीबी संघ सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. नॅथन कुल्टर नाईलने वेगवान मारा करीत सुरुवातीला विराट कोहलीला बाद केल्यामुळे केकेआरला लय गवसली. केकेआरने ईडनच्या खेळपट्टीला अनुकूल संघाची निवड केली होती. माझ्या मते बेंगळुरूचे खेळाडू खेळपट्टीच्या वेगामुळे चकित झाले असतील. कारण ख्रिस गेल आणि ए.बी. डिव्हिलियर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू अशा पद्धतीने बाद झाल्याचे क्वचित बघायला मिळते. टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ बाद होण्याचा योग दुर्लभ असतो. त्यामुळे रायडर्सला विजयाचे श्रेय द्यायला हवे. आयपीएलने आणखी एका नव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. काही संघ गुणतालिकेत वरच्या स्थानी आहेत तर काही संघांची तळाकडे घसरण झाली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स या दोन्ही संघांची कदाचित निराशा झाली असेल. गुजरातला गृहमैदानावर सलग दोन सामने गमवावे लागले. त्यामुळे हा संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुधारणा होत असल्याचे दिसत असलेल्या संघामध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट््स संघाचा समावेश आहे. धोनीला सूर गवसला असून संघ व्यवस्थापनाने योग्यवेळी समतोल साधल्यामुळे संघाची कामगिरी चांगली होत आहे.(गेमप्लान)