शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

रायडूचे नाबाद दमदार शतक

By admin | Updated: November 7, 2014 02:15 IST

गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा ६ गडी व ३३ चेंडू राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली.

अमहदाबाद : गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर शतकवीर अंबाती रायडूसह (नाबाद १२१ धावा, ११८ चेंडू, १० चौकार, ४ षटकार), शिखर धवन (७९ धावा, ८० चेंडू, ७ चौकार, १ षटकार) व कर्णधार विराट कोहली (४९ धावा, ४४ चेंडू, २ चौकार, २ षटकार)यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर यजमान भारताने गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा ६ गडी व ३३ चेंडू राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली.यादव, आश्विन व पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव ८ बाद २७४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे (८) झटपट माघारी परतल्यानंतर शिखर धवन व अंबाती रायडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करीत विजयाची मजबूत पायाभरणी केली. धवनला प्रसन्नाने माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर रायडूने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करीत विजय निश्चित केला. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या कोहलीला प्रसन्नाने बाद केले. त्यानंतर रायडूने सुरेश रैनाच्या (१४ धावा, ६ चेंडू, १ चौकार, १ षटकार)साथीने भारताला विजया समिप नेले. रैना बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ ५ धावांची गरज होती. त्यानतंर रायडूने रविंद्र जडेजाच्या (नाबाद १) साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंका संघाने कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजच्या (९२) नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ बाद २७४ धावांची मजल मारली. निराशाजनक सुरुवातीनंतर मॅथ्यूज व कुमार संगकारा (६१) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर श्रीलंकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मॅथ्यूजच्या अर्धश्तकी खेळीत १० चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. मॅथ्यूज व संगकारा यांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. एकवेळ श्रीलंकेची ३ बाद ६४ अशी अवस्था झाली होती. ४४व्या षटकात लंकेच्या ८ बाद २२० धावा होत्या. मॅथ्यूजने दहाव्या क्रमांकावरील फलंदाज धम्मिका प्रसादसोबत ५४ धावांची अभेद्य भागीदारी केली. भारतातर्फे वेगवान गोलंदाज उमेश यादवने ५४ धावांच्या मोबदल्यात २ महत्त्वाचे बळी घेतले. फिरकीपटू अश्विन व अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. सुरुवातीला अचूक मारा करणाऱ्या ईशांतला स्लॉग ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. श्रीलंका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. उपुल थरंगाच्या स्थानी संधी मिळालेल्या कुशल परेरला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. डावातील सहाव्या चेंडूवर उमेश यादवने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. तिलकरत्नेने आक्रमक पवित्रा स्वीकारताना यादवच्या दुसऱ्या षटकात सलग दोन चौकारांसह १० धावा वसूल केल्या. पटेलने पहिल्याच षटकात दिलशानला तंबूचा मार्ग दाखविला. त्याआधी, दिलशानने (३५ धावा, ३० चेंडू, ७ चौकार) संगकारासोबत दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. अश्विनने वैयक्तिक दुसऱ्या षटकात माहेला जयवर्धनेला बाद केले. संगकाराने कारकीर्दीली ८७ वे अर्धशतक ७३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. श्रीलंकेने ३१ व्या षटकात फलंदाजी पॉवर प्ले घेतला. त्यात त्यांनी ३० धावा वसूल केल्या. यादवने दुसऱ्या स्पेलमध्ये संगकाराचा अडथळा दूर केला. संगकाराने ८६ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. श्रीलंकेची ६ बाद १७९ अशी अवस्था असताना मॅथ्यूजने ४० व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर तीन चौकार तर परेराने एक षटकार ठोकला. पटेलने त्यानंतर षटकात परेराला बाद केले. मॅथ्यूजला तळाच्या फलंदाजांकडून विशेष सहकार्य लाभले नाही. अश्विनने सूरज रणदीवला क्लिनबोल्ड केले. श्रीलंकेने अखेरच्या पाच षटकांत ४६ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)