शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

आंतरराष्ट्रीय स्तरावर रविनाचे सुवर्ण यश, स्वसंरक्षणाच्या विचारातून निर्माण झाली आवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:04 IST

सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे.

प्रदीप मोकलवडखळ/पेण : सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे. त्याकरिता तिने पाचवीपासून स्वसंरक्षणाच्या विचारातूनच कराटे या खेळाची निवड केली आणि पुढे याच खेळाची तिला आवड निर्माण झाली. अथक मेहनतीने रविनाने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून सिल्व्हर, गोल्ड पदके जिंकू नरायगडचे नाव उंचावले आहे.सातत्यपूर्ण सरावातून रविनाने शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळविली आहेत, परंतु मे २०१७ मध्ये काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता तिची निवड झाली. तिने या स्पर्धेत एक सिल्व्हर, दोन ब्रांझ मेडल्स मिळवून यश संपादन केले आहे. गतवर्षी जानेवारी २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या ‘नॅशनल थांग-ता चॅम्पियनशिप’ मध्ये तिने प्रत्येकी एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल संपादन करून आपल्या यशाची चढती कमान अबाधित राखलीआहे.रविना रवींद्र म्हात्रे हिने आपल्या कराटे क्रीडा नैपुण्यातून प्राप्त केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशातून एक नवा वस्तुपाठ महिलांच्या समोर ठेवला आहे. आज महिलांच्या छेडछाडीचे, अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा स्त्री स्वयंपूर्ण होण्याकरिता स्वसंरक्षण अत्यावश्यक असून त्याकरिता रविनाप्रमाणे भूमिका स्वीकारून कराटेमधील कसब स्वीकारण्याचा मनोदय महिलांनी विशेष: विद्यार्थिनी वा युवतींनी या नवरात्रोत्सवात केल्यास, यंदाचा नवरात्रोत्सव त्यांच्याकरिता संस्मरणीय ठरू शकेल.>रविना म्हात्रेवर होतोय कौतुकाचा वर्षावमे २०१४ मध्ये रविनाने नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल, तर दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल युनिफाईट कराटे स्पर्धेत दोन गोल्ड मेडल्स मिळविली आहेत.मे २०१२ मध्ये नेपाळ येथे झालेल्या कराटे इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सिल्व्हर तर मे २०११ मध्ये चंदिगड येथे झालेल्या कराटे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्ड पदके संपादन केली आहेत.सर्वप्रथम मे २००८ मध्ये तिने दिल्लीत झालेल्या आॅल स्टाईल ओपन कराटे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सिल्व्हर मेडल्स संपादन केली आहेत. रविनाच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.