कळवण : विजयादशमी निमित्त मृत्युजय कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रावण दहन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात त्याची जय्यत तयारी सुरु असून यंदा मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या वर्षी शिवाजीनगर मधील माउली मैदानावर कार्यक्र माचे नियोजन केले असल्याची माहिती देवीदास शिंदे, भाऊसाहेब पगार, मनोज देवरे यांनी दिली. मागील वर्षीप्रमाणे यंदा ३१ फुटी रावणाची प्रतिकृती तयार केली आहे. रावण दहनासाठी फटाके वैजापूर येथून मागविण्यात आले आहेत. चांदवड येथील ढोलपथक मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी हर्षद भारती, स्वामी स्वामिनंद जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयश्री पवार , सदस्य नितीन पवार ,भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर पगार ,परशुराम पगार ,कौतिक पगार, रवीद्र शिरोरे, उपाध्यक्ष राजेंद्र खैरनार, सुनील महाजन, संजय मालपुरे, नंदकुमार खैरनार, अशोक जाधव, प्रकाश पगार, राजेद्र मैंद उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
कळवणला रावण दहन उत्सव
By admin | Updated: October 3, 2014 01:19 IST