शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोअरिंग लायन्स संघाचा दमदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:38 IST

रोअरिंग लायन्स आणि रॅगिंग बुल्स या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना मुंबई ओपन ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दुस-या दिवशी विजयी कूच केली.

मुंबई : रोअरिंग लायन्स आणि रॅगिंग बुल्स या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना मुंबई ओपन ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दुस-या दिवशी विजयी कूच केली. अन्य सामन्यात फ्लाइंग हॉक्स आणि ग्रिझली बेअर्स या संघांनीही विजयी आगेकूच केली.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत रोअरिंग लायन्सने दणदणीत विजय मिळवताना डेडली शाकर््सचा ३४-२८ असा पराभव केला. इशान संपत आणि उर्वी काते यांनी आपआपल्या एकेरी लढती मोठ्या फरकाने जिंकताना लायन्सला आघाडीवर नेले. यानंतर शाकर््सच्या वेद ठाकूरने युवराज आनंदचा ६-१ असा फडशा पाडून संघाला पुनरागमन करुन दिले. १२ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात लायन्सच्या अस्मी कोळीने शाकर््सच्या डेनिकाचा ६-४ असा पराभव केला.तसेच, मुलांच्या १४ वर्षांखालील सामन्यात आयुष हिंदळेकरने शाकर््ससाठी महत्त्वपुर्ण कामगिरी करताना लायन्सच्या आर्यन कुरेशीला ६-४ असे नमवले. परंतु, मुलींच्या १४ वर्षांखालील सामन्यात खुशी किंजर आणि मिश्र दुहेरीत साहेब सोढी आणि खुशी यांनी बाजी मारली आणि या जोरावर लायन्सने शाकर््सचा पाडाव केला.दुसरीकडे रॅगिंग बुल्सने जबरदस्त आक्रमक खेळ करताना ग्रोवलिंग टायगर्सचा ३९-१९ असा फडशा पाडला. ओम वर्मा, मारिया वझापल्ली, अझमीर शेख आणि परी चव्हाण या खेळाडूंनी आपआपल्या एकेरीच्या लढती मोठ्या फरकाने जिंकून बुल्स संघाला २०-३ अशी मोठी आघाडी मिळवून दिली. येथेच बुल्सचा विजय जवळपास निश्चित झाला.टायगर्स संघाच्या करिम खानने संघाला विजय मिळवून देताना मुलांच्या १४ वर्षांखालील गटात रिषभ कौशिकचा ६-१ असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे हा टायगर्सचा एकमेव विजय ठरला. यानंतर, मुलांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीतही बुल्स संघाने बाजी मारत सामना सहज जिंकला.