शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: July 14, 2017 21:33 IST

अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी  २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या    चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणतुंगांनी अंतिम लढतीच्या चौकशीची केलेली मागणी ही अपमानकारक असल्याचे भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून मात केली होती. 
रणतुंगा यांनी केलेल्या मागणीचा विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी खरपूस समाचार घेतला आहे. अंतिम लढतीत ९७ धावांची खेळी करत भारताच्या विश्ववियाची पायाभरणी करणाऱ्या गौतम गंभीरने रणतुंगांच्या वक्तव्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. "रणतुंगांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. हा आरोप अशा खेळाडूने केला आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मान दिला जातो. रणतुंगा यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजेत."अधिक वाचा ( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
(बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही हे आरोप फेटाळले आहेत. मी या आरोपांवर काही बोलून प्रकरण वाढवू इच्छित नाही. अशा चर्चांना अंत नसतो. आता मी जर १९९६ च्या श्रीलंकेच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ते चांगले वाटेल का, असा सवाल त्याने केला. पण रणतुंगांसारखा मोठा खेळाडू अशी वक्तव्ये करतो तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले. तर हरभजन सिंगने या प्रकरणी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.  
  रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.