शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

राणा ‘दा’ने जिंकवलं...

By admin | Updated: April 10, 2017 01:30 IST

अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात केलेल्या दमदार फलंदाजीच्या

रोहित नाईक / मुंबईअत्यंत थरारक झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह मुंबईकरांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला. दरम्यान, नितिश राणाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये झळकावलेले अर्धशतक निर्णायक ठरले. कोलकाताने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य मुंबईकरांनी एक चेंडू आणि ४ फलंदाज राखून पार केले. मुंबईला विजयी करणारा ‘राणा दा’ सामनावीर ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नितिश राणा चांगलाच गाजला. जोस बटलर, पार्थिव पटेल, रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड असे स्टार स्वस्तात बाद झाल्यानंतर एकटा राणा खंबीरपणे फटकेबाजी करीत होता. त्यामुळे मुंबईला ‘राणा दा’ जिंकवणार असा पक्का विश्वास मुंबईच्या पाठिराख्यांना होता आणि झालेही तसेच. मुंबईला पार्थिवच्या (२७ चेंडूत ३०) बसलेल्या पहिल्या धक्क्यानंतर मैदानात आलेल्या राणाने २९ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत ५० धावांची निर्णायक खेळी केली. त्याचबरोबर, अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द केले. हार्दिक - राणा यांनी ४१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हार्दिकने जास्तीत जास्त स्ट्राइक स्थिरावलेल्या राणाला देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राणाने मोक्याच्यावेळी आक्रमक पवित्रा घेत कोलकातावर आक्रमण केले. दरम्यान, कोलकाताच्या अंकित राजपूतने ३ बळी घेत मुंबईकरांवर जबरदस्त दडपण आणले होते. परंतु राणा - हार्दिक यांनी इतर गोलंदाजांना चोपताना मुंबईवरचा भार कमी केला. मुंबईला १९ धावांची आवश्यकता असताना राणा बाद झाला. परंतु, हार्दिकने निर्णायक फटकेबाजी केली. त्याचवेळी अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना कोलकाताकडून खेळत असलेला ‘मुंबईकर’ सुर्यकुमार यादवने केलेल्या चुकीचा फायदा मुंबईला झाला आणि एका धावेच्या जागी चौकार मिळाला. तत्पूर्वी, कर्णधार गौतम गंभीर आणि धडाकेबाज ख्रिस लीन यांनी आपली पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी करुन कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु कृणाल पंड्याने आपल्या पहिल्याच षटकात गंभीर आणि उथप्पा यांना माघारी धाडत कोलकाताला बॅकफूटवर आणले. गंभीरने १३ चेंडुत १९ धावा केल्या. तसेच, यानंतर बुमराहने लीनला माघारी धाडले. लीनने २४ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. ३ फलंदाज झटपट परतल्याने कोलकाताने सावध पवित्रा घेतला. पांड्याने दडपणाखाली आलेल्या कोलकाताला आणखी अडचणीत आणताना धोकादायक युसुफ पठाणलाही बाद केले. परंतु एका बाजूने टिकून राहिलेल्या मनिष पांड्येने दमदार खेळी करताना ४७ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८१ धावांची खेळी केली. मनिषच्या जोरावर कोलकाताला आव्हानात्मक मजल मारण्यात यश आले. मुंबईकडून कृणाल पांड्या आणि लसिथ मलिंगा यांनी अनुक्रमे ३ व २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)पंचांनी घेतला रोहितचा बळी....दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुनील नरेनने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पायचीत पकडून बहुमुल्य बळी मिळवला. परंतु, पंचांच्या निर्णयावर रोहितने व्यक्त केलेली स्पष्ट नाराजी सर्वांचे लक्ष वेधून गेली. रिप्लेमध्ये चेंडू प्रथम बॅटच्या कडेला लागून नंतर पॅडवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. मैदानावरुन जाता जाता रोहितने पंचांच्या निर्णयाचा स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.

संक्षिप्त धावफलक :कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकात ७ बाद १७८ धावा (मनिष पांड्ये नाबाद ८१, ख्रिस लीन ३२; कृणाल पांड्या ३/२, लसिथ मलिंगा २/३६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.५ षटकात ६ बाद १८० धावा (नितिश राणा ५0, पार्थिव पटेल ३०, हार्दिक पांड्या नाबाद २९; अंकित राजपूत ३/३७)