मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणूकीचे पडघम मुंबईत वाजू लागले आहेत. या निवडणूकीमध्ये आधीच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेचे ‘खेळाडू’ मैदानात उतरलेले असताना, आता यामध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील ‘पॅडींग’ केल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.१७ जूनला होणाऱ्या निवडणूकीसाठी आठवले सिध्दार्थ लॉ कॉलेजचे प्रतिनिधित्व करुन नव्या इनिंगसाठी सज्ज होतील. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांना या कॉलेजचे प्रतिनिधित्व मिळाले असून त्यांचा सामना असेल ते सत्ताधारी पवार - महाडदळकर गट आणि विद्यमान उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट या गटाशी. त्यामुळे आठवलेंच्या एन्ट्रीमुळे एमसीए निवडणूकीची चुरस वाढली आहे.
रामदास आठवले एमसीएच्या मैदानात
By admin | Updated: June 7, 2015 00:41 IST