शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

राजस्थान घोडदौड कायम राखणार ?

By admin | Updated: May 5, 2014 15:03 IST

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची होती.

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची होती. उद्या (सोमवार) हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघ अबुधाबीत एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला होता. केवळ चौकार जास्त असल्याने राजस्थानला विजयी घोषित करण्यात आले होते. असा थरार अनुभवाचा आस्वाद पुन्हा लुटता यावा यासाठी अहमदाबाद येथील क्रिकेटचाहते आतुर झाले आहेत.राजस्थानच्या इच्छाशक्तीसमोर कोलकाताचा संघ दुबळा वाटतो. राजस्थानने शनिवारी दिल्लीवर विजय मिळवून आपण जेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे ठणकावून सांगितले. या विजयात करुण नायर याने झंझावाती खेळ केला; तर दुसरीकडे, कोलकाताला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला आहे. फलंदाजी ही राजस्थानसाठी जमेची बाजू आहे. त्यांनी सलग तीन सामन्यांत विजय साजरा केला आहे आणि कोलकाताची कामगिरी पाहता ते विजयी चौकार मारतील, अशी आशा आहे. त्यांच्याकडे अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन, संजू सॅमसन आणि करुण नायर ही फौज आहे. गोलंदाजीत प्रवीण तांबे भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याला वॉटसन, केन रिचर्डसन, जेम्स फॉल्कनर, रजत भाटिया आणि धवल कुलकर्णी यांची साथ आहे. कोलकाताच्या बाबतीत विचार केल्यास गौतम गंभीर, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण यांना अद्याप सूर गवसलेला नाही. गंभीरने आत्तापर्यंत केवळ ५२ धावा, तर पठाणने ५९ धावा केल्या आहेत. संघात १४५ धावा करणारा मनीष पांडे अव्वल खेळाडू आहे. गोलंदाजीत सुनी नरीन वगळता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याला पीयूष चावला, मॉर्ने मॉर्केल, शकिब अल हसन आणि विनयकुमार यांच्याकडून योग्य साथीची आवश्यकता आहे.