अहमदाबाद : हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहलने घेतलेल्या प्रत्येकी एक विकेट आणि करुण नायर धावबाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाची इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध ११ षटकांत ३ बाद ८३ अशी स्थिती होती. सरदार पटेल स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आघाडीला फलंदाजीस आलेल्या अजिंक्य रहाणे व शेन वॉटसन यांना मोठी खेळी करता आली नाही. रहाणे १८ धावांवर असताना पटेलने त्याला पायचित केले. नंतर पुढच्या षटकात चहलने वॉटसनला २६ धावांवर स्टार्ककरवी झेलबाद केले. (वृत्तसंस्था)
राजस्थान ३ बाद ८३
By admin | Updated: April 25, 2015 09:31 IST