शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राहुलचे शानदार शतक, भारत दिवसअखेर ६ बाद ३१९

By admin | Updated: August 20, 2015 17:44 IST

के.एल.राहुलने शानदार शतक झळकावल्याने भारताची स्थिती मजबूत झाली असून भारताने ८७.२ षटकात ३१९ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. २० -  के. एल. राहुलने शानदार शतक (१०५) झळकावल्याने आणि रोहित शर्मा (७९) व विराट कोहली (७८) यांच्या अर्धशतकी खेऴीमुळे  भारताची स्थिती मजबूत झाली असून भारताने दिवसअखेर ८७.२ षटकात ३१९ धावा केल्या आहेत.  के. एल राहुलचे हे कारकिर्दीतील दुसरे शतक आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताचे मुरली विजय (०) व अजिंक्य रहाणे (४) हे दोन महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद २० अशी बिकट होती. मात्र विराट कोहली आणि  के. एल. राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. कोहली ७८ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या जोडीला आलेला स्टुअर्ट बिन्नीही लवकर बाद झाला. स्टुअर्ट बिन्नीने दहा धावा केल्या. त्यानंतर आलेला रिधिमान साहा आणि रोहित शर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माच ७९ धावांवर बाद झाला. रिधिमान साहा १९ धावांवर नाबाद राहिला आहे. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० अशा पिछाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान आज भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून शिखर धवन, हरभजन सिंग व वरूण अॅरॉनऐवजी मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी व उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.