शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी पदक जिंकल्याचा अभिमान - राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 03:19 IST

महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केल्या भावना

- जयंत कुलकर्णी औरंगाबाद : ‘जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाला कांस्यपदक जिंकून दिल्याचा मला अभिमान आहे. अजूनही मला २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची आशा आहे. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांना समर्पित करतो,’ अशी भावना महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने रविवारी कझाकिस्तानच्या नूर सुलतान येथून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यंदाच राहुलचा ‘लोकमत’च्या वतीने ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.राहुलच्या कारकीर्दीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी ठरली. या कमागिरीनंतर लगेच त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. राहुल म्हणाला, ‘जागतिक स्पर्धेत मी पदक जिंकले. आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्याने मी नशीबवान आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला मराठमोळा मल्ल बनणे आणि देशसाठी पदक जिंकणे यापेक्षा दुसरा कोणताच आनंद नाही. खरे तर मी सुवर्णपदकासाठी खेळायला हवे होते. कझाकिस्तानचा मल्ल आर. कलियेव्हविरुद्ध मी अखेरच्या काही सेकंदांत आक्रमक पवित्रा घेतला. पण याचा त्याला फायदा झाला. अखेरच्या काही सेकंदात कुस्ती गमावली नसती, तर मी अंतिम फेरीत खेळलो असतो.’कांस्य लढतीतील दबावाविषयी राहुल म्हणाला, ‘कांस्य पदकाच्या लढतीत उतरताना पदक जिंकण्याचा दबाव होता; परंतु मॅटवर उतरल्यानंतर मला जिंकण्याची ऊर्जा आपोआपच मिळाली.माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार व कुस्तीप्रेमी या सर्वांच्या आशीर्वादाने मी पदक जिंकण्यात यशस्वी ठरलो. याआधीही २०१३ मध्ये मी ली ग्राफविरुद्ध खेळलो होतो. त्या लढतीचा अनुभव आजच्या सामन्यात माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला.’’जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकूनही आज आॅलिम्पिकसाठी पात्र ठरता न आल्याची खंत राहुलला वाटत नाही. तो म्हणाला, ‘माझ्या गुरूंचे स्वप्न आॅलिम्पिक आहे. त्यामुळे मी त्याची आशा अद्यापही सोडली नाही. जोपर्यंत तंदुरुस्त राहील तोपर्यंत मी देशासाठी खेळत राहणार आहे. आॅलिम्पिकच माझे स्वप्न आहे. तथापि, आता मी आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून देऊ शकतो, अशी माझी ओळख निर्माण झाल्याचे समाधान मला वाटते.’ तसेच, ‘राहुलने जागतिक कांस्य पदक जिंकून बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केल्या,’ अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल बाळासाहेब आवारे यांनी दिली.

टॅग्स :Rahul Awareराहुल आवारे