मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची भारतीय ‘अ’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही शनिवारी घोषणा केली. याचबरोबर द्रविडकडे १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपदही असेल. या निर्णयामुळे ‘बिग-४’मधील चौथा ‘भिडू’ही बीसीसीआयचा घटक बनला आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हे यापूर्वीच बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य बनले आहेत. राहुल द्रविडने दोन्ही संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळण्याचे मान्य केले आहे, असे ठाकूर यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राहुल द्रविड ‘अ’ संघाचा प्रशिक्षक
By admin | Updated: June 7, 2015 01:07 IST