शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

राहुल द्रविड होणार मुख्य प्रशिक्षक?

By admin | Updated: April 4, 2016 02:26 IST

प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याला संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे म्हणून गळ घातली

मुंबई : प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याला संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे म्हणून गळ घातली असून सर्व काही जुळून आल्यास मिस्टर डिपेेंडेबल राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच असेल.भारतीय क्रिकेट संघाचे निर्देशक म्हणून रवि शास्त्री यांचा करार टी-२0 विश्वचषकाबरोबर संपुष्टात आला आहे, त्यामुळे टीम इंडियाला आता नवीन कोच असावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. नव्या प्र्रशिक्षकाचा शोध घेण्याची जबाबदारी सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीकडे देण्यात आली आहे. या समितीची बैठक मंगळवारी होणार असून त्यांनी या पदासाठी राहुल द्रविडकडे संपर्क साधला असून त्याचा निर्णय विचारला आहे. राहुलने त्यांना अद्याप होकार दिला नसला तरी तो मंगळवारपर्यंत आपला होकार कळविण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रवि शास्त्री हे संघासोबत निर्देेशक म्हणून कायम राहण्यास इच्छुक असल्याचे समजते, परंतु मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी नको आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संघाला आता पूर्णवेळ प्रशिक्षक असावा, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. मुख्य प्रशिक्षक आणि निर्देशक ही दोन्ही पदे एकावेळी संघात नसतील, हे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.