शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राहुल आवारेचे पुण्यात परतल्यावर जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 23:27 IST

जागतिक स्पर्धेत जिंकले होते कांस्यपदक

पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर आई-वडिलांनी केलेले कौतुक माझ्यासाठी स्पेशल आहे. जन्मदात्यांनी केलेल्या या कौतुकामुळे माझा उर अभिमानाने भरून आला, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया महाराष्ट्राला गुणवान मल्ल राहुल आवारे याने मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.कझाखस्तान येथील नूर सुलतान शहरात ही स्पर्धा नुकतीच झाली. यात फ्री स्टाईल प्रकारात ६१ किलो वजन गटामध्ये राहुलने कांस्यपदक पटकावले. या शानदार कामगिरीनंतर तो मंगळवारी संध्याकाळी पुण्यात परतला. यावेळी विमानतळावर त्याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. कुस्तीशौकिन, राहुल सराव करतो त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सहकारी, मित्र, कुस्ती संघटनेचे तसेच शासनाच्या क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांनी विमानतळावर गर्दी केली होती. या स्वागताने राहुल भारावून गेला होता. आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ‘‘कुस्ती हेच माझे सर्वस्व आहे. इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी  सर्वस्व पणाला लावत असतो. यात कधी यश मिळते, तर कधी अपयश. यामुळे कधी कौतुक होते, तर कधी टीकेला सामोरे जावे लागते. खेळाडू म्हणून मी या दोन्ही गोष्टींना सहजपणे सामोरा जातो. मात्र, ज्यांचे रक्त माझ्या धमण्यांत वाहत आहे, त्या आईवडिलांनी कौतुक केल्यावर मला आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या चेहºयावरील आनंद बघून जागतिक स्पर्धेत पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावना मझ्या मनात उमटली.’’राहुलचे विमानतळावर आगमन होताच सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. संकुलातील सहकाºयांनी त्याला उचलून घेत आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले.  विमानतळाहून निघाल्यानंतर राहुलने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर गोकुळ तालमीत जाऊन राहुलने आपले गुरू हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानंतर दत्तनगर चौकातून जांभुळवारी रोडने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलापर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आली.महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, प्रशिक्षक काका पवार, राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले,  जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, वस्ताद गोविंद पवार, गोकुळ तालमीचे वस्ताद व्यंकट परसे, राहुलचे वडील बाळासाहेब, आई शारदाबाई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.ऑलिम्पिक कोट्यासंदर्भातील निर्णय महासंघच घेईलराहुलने जागतिक स्पर्धेत पदक जिंकलेला ६१ किलो वजनगट आँलिम्पिकमध्ये नाही. ५७ आणि ६४ किलो वजन गट आॅलिम्पिकमध्ये आहेत. राहुल यापूर्वी ५७ किलो वजन गटातून खेळलाय. मात्र, २०२०च्या आॅलिम्पिकसाठी ५७ किलो वजन गटातून रवी दहिया पात्र ठरला आहे. आॅलिम्पिक कोट्यासंदर्भात विचारले असता राहुल म्हणाला, जागतिक स्पर्धेतील यश अनपेक्षित आहे. आॅलिम्पिकला अद्याप एक वर्ष शिल्लक आहे. यासंदर्भात भारतीय कुस्ती महासंघ योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत माझी तयारी सुरूच असेल. 

टॅग्स :Wrestlingकुस्ती