शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

रहीम, शाकिबने सावरले

By admin | Updated: February 12, 2017 05:30 IST

बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार मुशफिकर रहीमने भारतीय गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाताना नाबाद ८१ धावांची खेळी करीत एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्या

हैदराबाद : बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार मुशफिकर रहीमने भारतीय गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाताना नाबाद ८१ धावांची खेळी करीत एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी आपल्या संघाला ६ बाद ३२२ धावांची मजल मारून दिली. अष्टपैलू शाकिब-अल-हसनने ८२ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी रहीमला दुसऱ्या टोकाकडून मेहदी हसन मिराज (५१) साथ देत होता. बांगलादेशला भारताची पहिल्या डावातील ६ बाद ६८७ (डाव घोषित) धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ३६५ धावांची गरज असून त्यांचे चार गडी शिल्लक आहेत. भारतातर्फे उमेश यादवने १८ षटकांत ७२ धावांत २ बळी घेतले, तर फिरकी जोडी आश्विन व जडेजा यांना विशेष छाप सोडता आली नाही. आश्विनच्या गोलंदाजीवर १२ चौकार लगावले गेले. ईशांत शर्माने जुन्या चेंडूने प्रभावी मारा केला, मुशफिकरने त्याला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. या लढतीत भारताचे पारडे अद्याप वरचढ असले तरी अखेरच्या दोन सत्रांत बांगलादेश संघाचे मनोधैर्य त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे उंचावण्यास नक्कीच मदत झाली. युवा मिराजने पहिले कसोटी अर्धशतक झळकावताना संघर्षपूर्ण खेळी केली. मुशफिकरने २०६ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले, तर मिराजने १०३ चेंडूंमध्ये १० चौकार ठोकले. बांगलादेशने अखेरच्या सत्रात ३० षटकांत ७६ धावा वसूल केल्या. बांगलादेशला फॉलोआॅन टाळण्यासाठी अद्याप १६६ धावांची गरज आहे. त्याआधी, बांगलादेशने उपाहारानंतर दोन फलंदाज गमावित १२१ धावा फटकावल्या. भारताने शाकिब व शब्बीर रहमान यांना झटपट माघारी परतवत स्थितीवर नियंत्रण मिळवले. पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या शाकिबने १०३ चेंडूंमध्ये ८२ धावांची खेळी केली. शाकिब बाद झाल्यानंतर शब्बीरला (१६) मोठी खेळी करता आली नाही. (वृत्तसंस्था)त्याला जडेजाने तंबूचा मार्ग दाखवला. शाकिबने आश्विनच्या गोलंदाजीवर मिडॉनला उमेशच्या हाती झेल दिला. शाकिबने मुशफिकर रहीमसोबत १०७ धावांची भागीदारी केली. यादवचा तो भेदक मारापहिल्या सत्रात उमेश यादवने बांगलादेशच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ माजवली. उपाहारापूर्वी बांगालदेशने तीन गडी गमावले. उमेशने सातत्याने वेगवान मारा केला. उमेशच्या माऱ्यापुढे सलामीवीर तमीम इक्बाल (२५) सहज भासत होता, पण तो धावबाद झाला. उमेशने सकाळच्या सत्रात पॅव्हेलियन एंडकडून तीन षटके गोलंदाजी केली, पण त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर कर्णधाराने त्याचे एंड बदलविले. त्यानंतर त्याने सहा षटके अचूक मारा केला. उमेशचा आऊटस्विंग मारा खेळताना मोमिनुल व महमुदुल्लाह यांना सातत्याने अडचण जाणवली. त्याचा एक इनस्विंग चेंडू महमुदुल्लाहच्या पॅडवर आदळला, पण पंचांनी त्याला नाबाद ठरविले. भारताने डीआरएसचा आधार घेतला, पण चेंडू डाव्या यष्टीवर आदळत असल्यामुळे मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राहिला. महमुदुल्लाह व शाकिब यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भर घातली असली तरी त्यांच्या खेळण्यामध्ये मात्र सहजता नव्हती. त्यानंतर कर्णधाराने ईशांतकडे चेंडू सोपविला. ईशांतने महमुदुल्लाहला पायचित करीत कर्णधाराचा निर्णय साथ ठरविला. फलंदाजाने त्या वेळी डीआरएसचा आधार घेतला, पण निर्णय गोलंदाजाच्या बाजूने गेला. धावफलक भारत : पहिला डाव : ६ बाद ६८७ (डाव घोषित).बांगलादेश पहिला डाव : तमिम इक्बाल धावबाद २५, सौम्या सरकार झे. साहा गो. यादव १५, मोमिनुल हक पायचित गो. यादव १२, महमुदुल्लाह पायचित गो. शर्मा २८, शाकिब अल-हसन झे. यादव गो. आश्विन ८२, मुशफिकर रहीम खेळत आहे ८१, शब्बीर रहमान पायचित गो. जडेजा १६, मेहदी हसन मिराज खेळत आहे ५१. अवांतर (१३). एकूण : १०४ षटकांत ६ बाद ३२२. गडी बाद क्रम : १-३८, २-४४, ३-६४, ४-१०९, ५-२१६, ६-२३५. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १७-६-४६-०, ईशांत शर्मा १६-५-५४-१, आश्विन २४-६-७७-१, उमेश यादव १८-३-७२-२, रवींद्र जडेजा २९-८-६०-१.