शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदालचे नववे विजेतेपद

By admin | Updated: April 18, 2016 02:29 IST

आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले

मोंटे कार्लो : आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले नववे विजेतेपद जिंकले. या नवव्या विजेतेपदासाठी राफेलला चार वर्षे वाट पाहावी लागली होती. राफेल नदालने गायलला ७-५, ५-७, ६-० गुणांनी नमवित २८वे मास्टर्स टायटल जिंकले. तत्पूर्वी बलाढ्य राफेल नदालने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेला २-१ असे नमवले. विजेतेपदासाठी नदालसमोर फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचे कडवे आव्हान असेल.स्पेनच्या नदालने स्पर्धेतील आपला दबदबा सिद्ध करताना कसलेल्या मरेविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतरही विजय मिळवला. या स्पर्धेत २००५ ते २०१३ पर्यंत सलग ४६ सामने जिंकण्याचा पराक्रम केलेल्या नदलला अंतिम फेरीसाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. पहिल्या सेटमध्ये वेगवान खेळ करताना मरेने ६-२ अशी सहज बाजी मारत आघाडी घेतली होती.मात्र, यानंतर नदालने जबरदस्त पुनरागमन करताना मरेला आपला हिसका दाखवत सलग दोन सेट जिंकताना २-६, ६-४, ६-२ अशी पिछाडीवरून बाजी मारली. सुमारे अडीच तास रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ करताना उच्च दर्जाच्या टेनिसचे प्रदर्शन घडवले. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला, मोंफिल्सने आपल्याच देशाच्या विल्फ्रेड त्सोंगाचे तगडे आव्हान सलग दोन सेटमध्ये ६-१, ६-३ असे सहजपणे परतवून अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत नदाल आणि मरे एकमेकांसमोर लढले. याआधी २२०९ व २०११ मध्ये दोन्ही खेळाडू उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले आणि दोन्ही वेळेला नदालने बाजी मारली होती.मरेविरुद्धचा नदालचा एकूण रेकॉर्ड १७-६ असा झाला आहे.मोंफिल्सविरुद्ध नदालचा करिअर रेकॉर्ड ११-२ असा असून अंतिम फेरीत नदाल जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.