शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रदवांस्काचा धक्कादायक पराभव

By admin | Updated: May 31, 2014 05:53 IST

महिला विभागात मात्र तिसर्‍या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्निस्का रदवांस्काला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला

पॅरिस : जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, चौथे मानांकन प्राप्त स्वीत्झलंडचा रॉजर फेडरर, माजी विजेती रशियाची मारिया शारापोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात मात्र तिसर्‍या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्निस्का रदवांस्काला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. दुसर्‍या मानांकित जोकोविचने क्रोएशियाच्या मारिन सिलिचची झुंज ६-३, ६-२, ६-७, ६-४ ने मोडून काढली तर १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा मानकरी फेडररने ३१ व्या मानांकित रशियाच्या दिमित्री तुर्सुनोव्हववर ७-६, ६-७, ६-२, ६-४ ने मात केली. महिला विभागात सातव्या मानांकित शारापोव्हाने अर्जेन्टिनाच्या पाउला ओर्मेनियाचा ६-०, ६-० ने धुव्वा उडवित विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याची प्रचिती दिली. तिसर्‍या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्निस्का रदवांस्काला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रदवांस्काच्या पराभवामुळे महिला विभागात अव्वल तीन खेळाडू जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. अव्वल मानांकित व गतविजेत्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला दुसर्‍या फेरीत तर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन चीनच्या ली ना हिला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रदवांस्काला जेतेपदाची दावेदार मानल्या जात होते, पण तिचे आव्हान तिसर्‍याच फेरीत संपुष्टात आले. रदवांस्काला क्रोएशियाच्या बिगरमानांकित एल्जा टामजानोव्हिककडून ६-४, ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला. जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार्‍या रदवांस्काला फिलिप चेट्रियर कोर्टवर लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. २१ वर्षीय एल्जाने सलग सेट््समध्ये विजय मिळवित रदवांस्काला गाशा गुंडाळण्यात भाग पाडले. रशियाच्या मारिया शारापोव्हाला विजेतेपदाचा दावेदार मानल्या जात आहे. त्याआधी, गुरुवारी चौथे मानांकन प्राप्त रोमानियाच्या सिमोना हालेप आणि माजी विम्बल्डन चॅम्पियन चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिसरी फेरी गाठली. सिमोनाने ब्रिटनच्या हिथर वॉटसनचा ६-२, ६-४ ने तर पाचव्या मानांकित क्विटोव्हाने न्यूझीलंडच्या मरिना इव्हाकोव्हिचचा ६-४, ६-४ ने पराभव केला. दहावे मानांकन प्राप्त इटलीची सारा इराणी, ११ वे मानांकन प्राप्त सर्बियाची अ‍ॅना इव्हानोविच, रोमानियाची सोराना ख्रिस्टी, जर्मनीची आंद्रिया पेत्कोचिव्ह, रशियाची एकातेरिना मकारोव्हा तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्या. पुरुष विभागात १२ वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा रिचर्ड गास्के, १४ वे मानांकन प्राप्त इटलीचा फॅबियो फोग्निनी आणि २३ वे मानांकन प्राप्त गेल मोंफिल्स तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)