बंगळुरू : भारताचे माजी यष्टिरक्षक यांचे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर असून, यात सहकारी क्रिकेटपटूंकडून त्यांच्यावर कसा अन्याय झाला, याचा गौप्यस्फोट ते करणार आहेत.किरमाणी म्हणाले, ‘मी लोकांच्या अहंकाराचा नेहमीच बळी पडलो आहे. माझ्यासह खेळणारे निवड समितीचे सदस्य बनले. मी १९८६ ते १९९३ या काळात चांगली कामगिरी केली, तरीही माझी निवड करण्यात आली नाही. या विषयी मी लिहिले आहे.’ २०११ विश्वचषक दरम्यान ते पुस्तक प्रकाशित करणार होते. ते म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. मला सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.’ त्यांनी या वेळी आपल्या पुस्तकाचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. (वृत्तसंस्था)
किरमाणी करणार गौप्यस्फोट
By admin | Updated: December 31, 2015 01:51 IST