शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

आर. बालसुब्रमण्यम्, कुलकर्णी, मांढरेचा विजय

By admin | Updated: December 24, 2016 01:06 IST

नूतन बुद्धिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अकॅडमीच्यावतीने आयोजित सूरज फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर

कुपवाड : नूतन बुद्धिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अकॅडमीच्यावतीने आयोजित सूरज फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर पुण्याचा चिन्मय कुलकर्णी, हेमंतकुमार मांढरे व तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रमण्यम् संयुक्तपणे पाच गुणांसह प्रथम स्थानावर आहेत. या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर चंद्रशेखर गोखले, केतन कुलकर्णी हे साडेचार गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅलीच्या क्रीडा संकुलामध्ये या सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा होत आहेत. स्पर्धेत शुक्रवारी पाचव्या फेरीत पुण्याचा चिन्मय कुलकर्णी आणि निखिल दीक्षित यांच्यात झालेल्या डावात चिन्मयने निखिलचा पराभव केला. रवींद्र निकम आणि तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रमण्यम् यांच्यातील डावात बालसुब्रमण्यम्ने रवींद्रचा पराभव केला. केदार जोशी व चंद्रशेखर गोखले यांच्यातील डावात चंद्रशेखरने केदारचा पराभव केला. हेमंतकुमार मांढरे व श्रीराज भोसले यांच्यातील डावात मांढरेने भोसलेचा पराभव केला. श्रीधर वेल्हाळ व पुण्याचा निखिल बिडकर यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. याबरोबरच या फेरीत केतन कुलकर्णीने शुभम मालाणीचा, मुदस्सर पटेलने हर्ष भोबेचा, प्रसाद खेडकरने प्रदीप शिर्केचा, रोहित मोकाशीने रिद्धी उपासेचा पराभव करून आघाडी कायम केली. (वार्ताहर)