लंडन : 2क्22 च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळविताना कथित लाच दिल्याप्रकरणी प्रायोजकांनी देखील विरोधी सूर आळवल्याने यजमान पदाबाबत शंका आणखी बळावली आहे. कुठल्याही आयोजनात प्रायोजकांची भूमिका मोठी असते. पण प्रायोजक असलेले आदिदास, कोकाकोला, व्हिसा, सोनी यासारखे नामवंत ब्रॅन्ड तसेच जगातील अग्रगण्य तेल कंपनी बीपी आणि बडवायझर बीअर यांनी कतारला 2क्22चे यजमानपद सोपविण्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत तीव्र विरोध दर्शवित प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. ब्राझील विश्वचषक सुरू होण्यास आता दोनच दिवस शिल्लक असताना कतारला यजमानपद देतेवेळी अनियमितता बाळगल्याबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ(फिफा) वादाच्या भोव:यात अडकला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अमेरिकेचे माजी वकील मायकेल गार्सिया यांच्या अध्यक्षतेखाली फिफाने चौकशी आयोगही बसवला. गार्सिया पुढील सहा आठवडय़ांत आपला अहवाल सोपवतील.
कतारच्या यजमानपदावर प्रायोजकांचेही विरोधी सूर
By admin | Updated: June 11, 2014 02:49 IST