शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पीवायसी हिंदू जिमखानाचा दबदबा

By admin | Updated: March 16, 2017 03:37 IST

पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आंतरक्ल्ब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावताना मुंबईच्या सीसीआय क्लब संघाचा २४-७ असा धुव्वा उडवला

मुंबई : पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आंतरक्ल्ब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावताना मुंबईच्या सीसीआय क्लब संघाचा २४-७ असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पुणेकरांनी एकहाती वर्चस्व राखताना मुंबईकरांना डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने मुंबईतील टेनिस कोर्टवर झालेल्या या अंतिम सामन्यात १००+ गटात जयंत कढे - हेमंत बद्रे यांनी राजेश बत्रा - राजीव वालिया यांचा ६-२ असा पराभव करुन हिंदू जिमखानाला आघाडीवर नेले. यानंतर ९०+ गटामध्ये हिमांशू गोसावी - केदार शहा यांनी मुंबईच्या चेतन देसाई - इंतीकाब अली यांचा ६-४ असा पाडाव करुन संघाला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या व अंतिम खुल्या गटात मुंबईकरांकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, या गटातील दोन्ही सामन्यात त्यांनी निराशाच केली.या गटातील पहिल्या सामन्यात अनुप मिंडा - अभिषेक ताम्हाणे यांनी अंब्रीश अरोरा - गगन मंगत यांना ६-० असे लोळवल्यानंतर, केतन धुमाळ - परज नाटेकर यांनी विजय छाब्रीया - विक्रम संपत यांचा ६-१ असा धुव्वा उडवत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)