शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब विजयी

By admin | Updated: April 9, 2017 03:54 IST

कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (४४) आणि डेव्हिड मिलर (३0) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग लढतीत रायझिंग

इंदौर : कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (४४) आणि डेव्हिड मिलर (३0) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग लढतीत रायझिंग पुणे सुपर जायंट संघावर एक षटक व सहा गडी राखून मात केली.फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर, पुणे सुपर जायंटने बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ६ बाद १६३ धावा केल्या; परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्सवेल आणि मिलरच्या नाबाद खेळीच्या बळावर विजयी लक्ष्य १९ व्या षटकात ४ फलंदाज गमावून १६४ धावा करीत पूर्ण केले. मॅक्सवेलने त्याच्या खेळीत २0 चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि २ चौकार मारले, तर मिलरने २७ चेंडूंत २ षटकार व एक चौकार मारला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४७ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली.सलामीवीर हाशिम अमला (२८) यांनी चांगली सुरुवात केली; परंतु तिसऱ्याच षटकात मनन व्होरा (१४) तंबूत परतल्याने ही भागीदारी तुटली. रिद्धीमान साहा (१४) हादेखील जास्तवेळ टिकू शकला नाही आणि तो तीन षटकानंतर इम्रान ताहिर (२९ धावांत २ बळी) याच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. ताहिरनेच अक्षर पटेल (२४) याच्या रूपाने दुसरा बळी घेतला. राहुल चाहरने अमलाच्या रूपाने एकमेव विकेट घेतली.त्याआधी पुणे संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे नवव्या षटकातच ३ फलंदाज अवघ्या ४९ धावांवर परतले. त्यानंतर स्टोक्स (३२ चेंडूंत ५0) याने आक्रमक फलंदाजी केली. त्याला मनोज तिवारी (२३ चेंडूंत ४0 धावा) चांगली साथ मिळाली. तिवारी व डॅनियल क्रिस्टियन यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ३0 धावांची लूट केली. तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यासाठी आयपीएलची पदार्पणीय लढत संस्मरणीय ठरली. त्याने त्याचा पहिला बळी दोन चेंडूंच्या आत मिळवला. त्याने अजिंक्य रहाणे (१९) याला डिप कव्हरमध्ये झेलबाद केले. कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२६) हादेखील चुकीचा फटका मारून तंबूत परतला. अनुभवी महेंद्रसिंहही लवकर बाद झाल्याने पुणे संघाची १२ व्या षटकांत ४ बाद ७१ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर १४ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलेल्या स्टोक्सने तिवारीच्या साथीने ३७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करीत पुणे संघाचा डाव सावरला. स्टोक्सने त्याच्या खेळीत ३ षटकार व २ चौकार मारले. तिवारीनेदेखील आक्रमक फलंदाजी करताना ३ चौकार व २ षटकार मारले. क्रिस्टियन याने संदीपच्या गोलंदाजीवर २ चौकार मारताना पुणे संघाला १६३ पर्यंत मजल मारुन दिली.संक्षिप्त धावफलकरायझिंग पुणे सुपर जायंट : २0 षटकांत ६ बाद १६३. (बेन स्टोक्स ५0, मनोज तिवारी नाबाद ४0, स्मिथ २६, रहाणे १९, क्रिस्टियन १७. संदीप शर्मा २/३३, अक्षर पटेल १/२७, टी. नटराजन १/२६, स्वप्नील सिंग १/१४).किंग्ज इलेव्हन पंजाब : १९ षटकांत ४ बाद १६४. (ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४४, डेव्हिड मिलर नाबाद ३0, हाशिम अमला २८, अक्षर पटेल २४. इम्रान ताहिर २/२९, दिंडा १/२६, चहर १/३२).