शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

केकेआरविरुद्ध पंजाब आज लढत

By admin | Updated: May 9, 2015 00:42 IST

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल ८ मध्ये ईडनवर शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार असून स्थानिक मैदानावरील हा

कोलकाता : गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल ८ मध्ये ईडनवर शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार असून स्थानिक मैदानावरील हा अखेरचा सामना जिंकून ईडनला विजयी निरोप देण्याचा संघाचा निर्धार आहे.गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरला विजयासह प्ले आॅफ गाठायचे आहे. दुसरीकडे आरसीबीकडून १३८ धावांनी पराभूत झालेला पंजाब प्ले आॅफ शर्यतीबाहेर झाला आहे. उर्वरित चारही सामने त्यांना इभ्रत शाबूत ठेवण्यासाठीजिंकायचे आहेत.मागच्या सामन्यात ख्रिस गेलने ५७ चेंडूत ११७ धावा ठोकत पंजाबला आरसीबीने मोठ्या फरकाने नमविले. गेलच्या तडाख्याने अस्ताव्यस्त झालेल्या पंजाबला मनोबल उंचावणे कठीण होऊन बसले. केकेआरने ईडनवर ६ पैकी एकच सामना गमावला व त्या सामन्यात गेलने तुफानी खेळ केला होता. त्यानंतर सलग ३ विजय नोंदविले व राजस्थानविरुद्धचा सामना पावासात वाहून गेला होता. केकेआरच्या गोलंदाजांनी वेळोवेळी देखणी कामगिरी केली आहे. सुनील नरेनला बीसीसीआयने तंबी देत क्लीन चिट दिल्यानंतर केकेआरने काल दिल्लीविरुद्ध ४ फिरकीपटू उतरवित शानदार विजय साजरा केला. लेगस्पिनर पीयूष चावला याने ४ बळी घेतले तर आॅस्ट्रेलियन ब्रॅड हॉग यानेही उत्कृष्ट मारा केला. या संघाचे गोलंदाज सांघिक खेळीत अपयशी ठरले; पण कुणी ना कुणी सामन्यात उपयुक्त फलंदाजी केली. युसूफ पठाणने काल २४ चेंडूत ४२ आणि योहान बोथाने पाच चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. ईडनच्या मंद खेळपट्टीवर उत्कृष्ट फिरकी गोलंदाजाची उणीव पंजाबला जाणवणार आहे. अक्षर पटेल आणि कर्णवीरसिंग यांना प्रभाव टाकता आला नाही. मागच्या सामन्यात गेलने दोघांच्या गोलंदाजीवर ९१ धावा केल्या होत्या. वेगवान मारा देखील प्रभावी दिसत नाही. मिशेल जॉन्सन लौकिकानुसार चमकलेला नाही. मागच्या पर्वात उपविजेता राहिलेल्या पंजाबने कोच संजय बांगरला श्रेय दिले होते. यंदा सर्वस्व पणाला लावल्यानंतरही संघाला यश मिळालेले नाही. बांगरच्या मते ‘आमच्यासाठी हे कठीण वर्ष आहे. सर्व उपाययोजना करूनही विजय मिळविणे कठीण जात आहे.’(वृत्तसंस्था)