शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पंजाब ‘रॉयल’, की राजस्थान ‘किंग’ आज ठरणार

By admin | Updated: April 10, 2015 08:38 IST

वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल जॉन्सन, अक्षर पटेल, मुरली विजय, डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गत उपविजेत्या किंग्ज

पुणे : वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल जॉन्सन, अक्षर पटेल, मुरली विजय, डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गत उपविजेत्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आपल्या होम ग्राऊंडवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या लढतीसाठी सज्ज झाला आहे. मार्गदर्शक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून हा संघ पुण्यात तळ ठोकून आहे. गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मैदानावर गुरुवारी (दि. १०) रात्री होणाऱ्या या लढतीसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान परतावून लावण्यासाठी राजस्थानकडे शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, स्टीवन स्मिथ, जेम्स फॉकनर असे तगडे खेळाडू आहेत. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पंजाबची खेळी रॉयल होते की राजस्थान किंग ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. राजस्थानमध्ये स्मिथचे एक प्रभावी अस्त्र आहे. सध्या तो चांगलाच बहरात आहे. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९.८६ च्या सरासरीने २ हजार ९६ धावा फटकावल्या असून, त्यात ८ शतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत स्मिथने आॅस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४०२ धावा फटकावल्या आहेत. याशिवाय राजस्थानने ख्रिस मॉरिस यालादेखील करारबद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. याशिवाय संघाकडे दिनेश साळुंखे व दिनेश साहू हे फिरकी गोलंदाज आहेत. कर्णधार शेन वॉटसन व स्टुअर्ट बिन्नी यांसारख्या खेळाडूंमुळे संघाची ताकद नक्कीच वाढलेली आहे. गत आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली, धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग यांसारख्या किंग फलंदाजांची भक्कम फळी पंजाबकडे आहे. मुरली विजय, आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन यामुळे गोलंदाजीची धारदेखील वाढली आहे. दोन्ही संघांत फलंदाजी व गोलंदाजीचे संतुलन दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी होणारा खेळ यावरच सरस संघ कोण हे ठरेल.