शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीची शिकार करण्यास पंजाब सज्ज

By admin | Updated: May 5, 2017 01:09 IST

आयपीएल प्ले आॅफच्या शर्यतीत असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ स्पर्धेतून बाद झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शुक्रवारी शानदार विजयाची नोंद

बंगळुरू : आयपीएल प्ले आॅफच्या शर्यतीत असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ स्पर्धेतून बाद झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शुक्रवारी शानदार विजयाची नोंद करण्यास सज्ज झाला आहे. नऊ सामन्यांत आठ गुणांसह पंजाब पाचव्या स्थानावर आहे. तळाच्या स्थानाला असलेल्या बँगलोरचे ११ सामन्यांत आठ पराभवानंतर केवळ ८ गुण झाले.प्ले आॅफसाठी पंजाबला प्रत्येक लढतीत विजय आवश्यक आहे. आरसीबी देखील उर्वरित सामने जिंकून सन्मानाने निरोप घेण्यास इच्छुक असेल. दिग्गजांना वगळून कोहली नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. पंजाबने मागच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दहा गड्यांनी विजय साजरा केला होता. सध्याचा फॉर्म बघता आरसीबीविरुद्धचा सामना त्यांना कठीण जाणार नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखालील या संघाकडून हशिम अमलाने एका शतकासह ३१५ धावा केल्या, तर मार्टिन गुप्तिलने २७ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली आहे. नऊ सामन्यांत केवळ १९३ धावा करणाऱ्या मॅक्सवेलकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पंजाबच्या फलंदाजांपुढे एकसंघ कामगिरी करण्याचे आव्हान आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा आणि वरुण अ‍ॅरोन, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर भिस्त असेल. आरसीबीला फलंदाजांच्या अपयशाने ग्रासले आहे. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, हे आक्रमक फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मनदीपसिंग, केदार जाधव आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी घोर निराशा केली. लेगस्पिनर सॅम्युअल बद्री आणि यजुवेंद्र चहल यांनी ११ गडी बाद केले, पण वेगवान गोलंदाजांनी आशेवर पाणी पाडले.(वृत्तसंस्था)