शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या खेळाडूंची वागणूक संशयास्पद - प्रीती झिंटा

By admin | Updated: August 19, 2015 10:44 IST

किंग्स इलेव्हन पंजाब'च्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंग करण्याच्या प्रक्रियेत सहभाग असू शकतो' असा गौप्यस्फोट पंजाब संघाची सहमालक प्रीती झिंटाने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ -  मॅच फिक्सिंग करणा-यांवर जरब बसवण्यासाठी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी टाकण्याच्या न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतरही या स्पर्धेत अद्यापही गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे.  ' किंग्स इलेव्हन पंजाब'च्या काही खेळाडूंची वागणूक संशयास्पद असून त्यांचा मॅच फिक्सिंगच्या प्रक्रियेत सहभाग असू शकतो ' असा गौप्यस्फोट पंजाब संघाची सहमालक प्रीती झिंटाने केल्याने एकच खळबळ माजली आहे. तसेच बीसीसीआयच्या भ्र्ष्टाचारविरोधी पथकाला आयपीएलमधील गैरप्रकार रोखण्यात आल्याचा आरोपही तिने केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
आयपीएल कार्यकारिणीच्या ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीसाठी आयपीएलचे फ्रँचाइजी मालकांसह चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर, खजिनदार अनिरुद्ध चौधरी व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली उपस्थित होते. त्यावेळी प्रीतीने बीसीसीआय अधिका-यांशी संघातील खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये असलेल्या सहभागाबाबत चर्चा केली. 
आयपीएल स्पर्धेदरम्यान पंजाब संघाचे काही सामने हे निकाल आधीच निश्चित असल्याप्रमाणे सुरू होते, असे आपल्याला वाटल्याचे प्रीतीने सांगितले. सामना सुरू असताना काही लोक निकालाविषयी भविष्य वर्तवत असत व ते तंतोतंत खरे ठरत असे, त्यामुळे आपल्याला संशय आला, असे प्रीतीने म्हटले आहे. सायकॉलीजीची (मानसशास्त्र) विद्यार्थिनी असल्याने आपण खेळाडूंच्या देहबोलीचा अभ्यास करू शकतो तसेच (काही वेळा) त्यांचे मनही वाचू शकत असू, असेही प्रीतीने या बैठकीदरम्यान सांगितले. काही खेळाडूंचे वर्तन संशयास्पद वाटले तेव्हा आपण त्यांना खडसावले तर काहींना सामन्यात खेळू दिले नाही तर काहींची संघातून हकालपट्टीही केली, असेही ती म्हणाली. याप्रकरणी आपल्याला संबंधितांना आधीच माहिती द्यायची इच्छा होती, मात्र पुरेसे पुरावे हातात नसल्याने आपण गप्प राहिल्याचे प्रीतीने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 
दरम्यान हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर 'आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे' असे प्रीतीने आज म्हटले आहे.
कोलकाता येथे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या  कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बीसीसीआयचे विधी सल्लागार यु.एन. बॅनर्जी यासंदर्भात अहवाल सादर करणार आहेत.