शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

थरारक विजयासह पंजाबने आव्हान राखले कायम

By admin | Updated: May 9, 2017 23:37 IST

टीतटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 14 धावांनी मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीसाठी आपले आव्हान कायम

ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. 9  -  अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 14 धावांनी मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. ख्रिस लीनने केलेल्या झुंजार खेळीला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने हा सामना कोलकात्याच्या हातातून निसटला. आजच्या विजयाबरोबरच पंजाबच्या खात्यात 12 सामन्यांतून 6 विजय आणि 12 गुण जमा झाले आहेत. आता उर्वरित दोन्ही लढती जिंकल्यास प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्याची संधी पंजाबकडे असेल.  
 
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांनी कोलकात्याला दमदार सुरुवात रून दिली. मात्र नारायण बाद झाल्यावर कोलकात्याच्या धावगतीस ब्रेक लागला. एकीकडून लीन पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत असताना दुसऱ्या बाजूने गौतम गंभीर (8), रॉबिन उथप्पा (0), मनीष पांडे (18)  यांनी साफ निराशा केली. 
52 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 84 धावा कुटणारा लीन खेळपट्टीवर असेपर्यंत कोलकात्याला विजयाची आस होती. पण लीन 18 व्या षटकात धावबाद झाला आणि कोलकात्याच्या हातून सामना निसटला. शेवटी कोलकात्याला 20 षटकात 6 बाद 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. 
 
 तत्पूर्वी  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्याची मोकळीक दिली नाही. मनन व्होरा (25), मार्टिग गुप्टिल (12) आणि शॉन मार्श (11) हे झटपट बाद झाल्याने पंजाबची अवस्था 3 बाद 56 अशी झाली होती. 
 
मात्र कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (25 चेंडूत 44 धावा) आणि वृद्धिमान साहा (33 चेंडूत 38 धावा) यांनी  चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येतच्या दिशेने नेले. पण मॅक्सवेल बाद झाल्यानंतर पंजाबच्या धावसंख्येला पुन्हा खिळ बसला. अखेरच्या षटकांत राहुल तेवटिया (नाबाद 15) याने फटकेबाजी करत पंजाबला 6 बाद 167 धावांपर्यंत मजल मारून दिली. कोलकात्याकडून कुलदीप यादव आणि ख्रिस व्होक्सने प्रत्येकी दोन तर नारायण आणि उमेश यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.