शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या सांघिक कामगिरीचा विजय

By admin | Updated: April 23, 2017 23:47 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमातील तिसरा विजय गुजरात लायन्सवर मिळवला.

आकाश नेवे/आॅनलाइन लोकमतराजकोट, दि. 23 -  किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमातील तिसरा विजय गुजरात लायन्सवर मिळवला. पंजाबला या सत्रात सांघिक कामगिरी प्रत्येक सामन्यात करता आली नाही. मात्र या वेळी कर्णधार मॅक्सवेल याने ही भट्टी जुळवली. त्याचा परिणा सामन्याच्या निकालावर दिसला. पंजाबने गुणतक्त्यात तळाशी असलेल्या लायन्सला पराभूत केले.आमलाने या आधी मुंबई इंडियन्स विरोधात शतक झळकावले होते. मात्र गोलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. आजचा सामनाही फक्त फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असा होणार असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात मात्र तसे फारसे दिसले नाही. आमलाच्या अर्धशतकानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोहित शर्मा आणि के सीकरिअप्पा यांच्या स्पेलमुळे गुजरात लायन्स मागे पडले. धोकादायक मॅकक्युलमला संदीप शर्माने पहिल्याच षटकांत बाद केले. फिंच आणि रैना बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक याने दिलेली झुंज अपयशी ठरली. अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी या सामन्यात महत्त्वाची ठरली. त्याने १७ चेंडूूतच ३४ धावा केल्या. तर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना आणि ड्वेन स्मिथला बाद करत गोलंदाजीतही दम दाखवून दिला. या सामन्यात सर्र्वात लक्षवेधी ठरले ते आमलाचे अर्धशतक. या अर्धशतकासोबतच त्याने आॅरेंज कॅप पटकावली. या शर्यतीत त्याने सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. त्याने या सत्रात २९९ धावा केल्या आहेत. गुजरात लायन्सचा नाथु सिंह याचा स्पेलदेखील या सामन्यात भेदक ठरला. १४०च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या नाथु सिंह याने २ षटकांत फक्त ७ धावा देत १ गडी बाद केला. त्यानंतर त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही. त्याचा फटका गुजरातला अखेरच्या षटकांत बसला.