शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली

By admin | Updated: February 4, 2016 03:40 IST

पुणेरी पलटणने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात दबंग दिल्लीला ३८-२० असे लोळवले. यासह पुणेकरांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली

बंगळुरु : पुणेरी पलटणने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात दबंग दिल्लीला ३८-२० असे लोळवले. यासह पुणेकरांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून दिल्लीकरांना मात्र सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. तत्पूर्वी पटणा पायरेट्सने सलग दुसरा विजय नोंदवताना बंगळुरु बुल्सला ३३-२४ असे नमवले.श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पुणेकरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक हल्ला चढवत दिल्लीला दबावाखाली आणले. १३व्या मिनीटाला पुणेकरांनी १०-६ अशी भक्कम आघाडी घेतली. कर्णधार मनजीत चिल्लरने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावताना चढाई व पकडीत प्रत्येकी ४ गुणांची कमाई करुन निर्णायक अष्टपैलू खेळी केली. तर दीपक हूडाने तुफान चढाया करताना ९ गुण वसूल केले. मध्यंतराला पुणेकरांनी १६-९ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. दिल्लीचा हुकमी एक्का काशिलिंग आडके पुणेकरांसमोर फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याच्या अनेक चढाया पुण्याच्या मजबूत पकडीत अडकल्या. काशिलिंगच्या १४ चढायांपैकी केवळ ४ चढाया यशस्वी ठरल्या. त्याने ५ गुणांची कमाई केली. तर रोहित कुमार, कर्णधार रविंदर पहल व सुरजीत सिंगची झुंज अपयशी ठरली.तत्पूर्वी रंगतदार सामन्यात बलाढ्य पटणाने सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान बंगळुरुला ३३-२४ असे नमवले. सुरुवातीलाच सुरजीत नरवाल व अमित राठी या अव्वल खेळाडूंच्या जबरदस्त पकडी करुन पटणाने यजमानांना धोक्याचा इशारा दिला. यानंतर त्यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत बाजी मारली. १६ व्या मिनीटाला बंगळुरुवर लोण चढवून पटणाने मध्यंतराला २०-१० अशी भक्कम आघाडी घेतली.