शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर पूजा घाटकर, रिझवीचा सुवर्णवेध; पुरुषांचा १० मीटर एअर पिस्तुलमध्ये क्लीन स्वीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:18 IST

पुणेकर पूजा घाटकरने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावताना १० मीटर एअर रायफल गटात सुवर्ण वेध घेतला. त्याच वेळी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात भारतीय खेळाडूंनी एकहाती वर्चस्व राखत क्लीन स्वीप करताना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर कब्जा केला.

ब्रिसबेन : पुणेकर पूजा घाटकरने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावताना १० मीटर एअर रायफल गटात सुवर्ण वेध घेतला. त्याच वेळी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात भारतीय खेळाडूंनी एकहाती वर्चस्व राखत क्लीन स्वीप करताना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर कब्जा केला.महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटात पूजाने शानदार कामगिरीसह सुवर्ण पटकावतानाच, अंजुम मोदगिलने रौप्यपदकावरनाव कोरले. या दोघींच्याधडाक्यापुढे सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसो हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.दरम्यान, या गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी तिसरी भारतीय मेघना सजनार पाचव्या स्थानी राहिली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात युवा नेमबाज शाहजार रिझवी याने चमकदार कामगिरी करताना ओंकार सिंग आणि जीतू राय यासारख्या कसलेल्या नेमबाजांना पिछाडीवर टाकले. निर्धारित २४ शॉटनंतर रिझवीने २४.७ गुणांसहसुवर्ण पक्के केले, तर ओंकार (२३६) आणि जीतू (२१४.१) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत अंजुमने दमदार सुरुवात केली. पहिल्या पाच शॉटदरम्यान ती आघाडीवर होती. मात्र, पूजाने १०व्या शॉटनंतर चित्र पालटले. हीच आघाडीअखेरपर्यंत कायम राखताना तिने सर्वाधिक २४९.८ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले. अंजुमने २४८.७ गुणांसह रौप्य पटकावले, तर मार्टिनाला २२४.८ गुणांसह कांस्यवर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)‘- दुसरीकडे, पुरुषांच्या स्कीट प्रकारात मेराज अहमद खान, अंगद वीर सिंग बाजवा आणि शीराज शेख यांनी १२५ पैकी ११९ गुणांची कमाई करतशूट आॅफमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा