शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पुणे संघ यंदा नव्या आव्हानांसाठी सज्ज

By admin | Updated: April 4, 2017 00:14 IST

पुणे संघाची भूतकाळातील कामगिरी समाधानकारक नसली तरी त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत

पुणे : पुणे संघाची भूतकाळातील कामगिरी समाधानकारक नसली तरी त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. संघ नव्या आव्हानांसाठी सज्ज आहे. या मोसमात आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू, असा आशावाद आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सोमवारी पुण्यात व्यक्त केला.सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील लढतीने बुधवारी (दि. ५) आयपीएलच्या दहाव्या सत्राचा प्रारंभ होत आहे. त्यानंतर पुण्याची पहिली लढत गुरूवारी (दि. ६) घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरूद्ध होत आहे. यासाठी संघाचा सराव जोरात सुरू आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना अजिंक्य म्हणाला, ‘‘खरे तर, मागील वर्षी आमच्या संघाने चांगला खेळ केला. पण, आम्ही थोडक्यात पराभूत झालो. एक-दोन षटकांतील खेळाने सामन्याचे निकाल फिरले. पण, खेळात हे चालायचेच. आता या सर्व गोष्टी मागे पडल्या आहेत. मोसमाचा प्रारंभ चांगला होणे महत्वाचे आहे. त्यावर आमचा भर असेल.’’नुकत्याच झालेल्या भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीला दुखापत झाल्याने अखेरच्या सामन्यात अजिंक्यने नेतृत्व केले. त्याने नेतृत्वगुण आणि कामगिरीच्या जोरावर भारताला ही निर्णायक लढत जिंकून दिली. यामुळे भारताने २-१ अशा फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. यासंदर्भातील घडामोडींवर तो भरभररून बोलला. ‘‘दुखापतीमुळे निर्णायक सामन्यात विराट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काही काळ दु:खाचे वातावरण होते. मात्र, लगेच सर्वांनी स्वत:ला सावरत सर्वस्व झोकून खेळण्याचा निर्धार केला. नेतृत्वाचा विचार करता विराट आणि माझी शैली वेगळी आहे. यामुळे अचानक नेतृत्वाची जबाबदारी आल्यावर संघसहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवणे, त्यांची लय बिघडू न देणे यावर मी भर दिला. आमचे सर्वांचे लक्ष्य सामना जिंकण्याचे होते. यामुळे एक टीम म्हणून सहजपणे आव्हानांना सामोरे गेलो. पहिल्या दिवशी आॅस्ट्रेलियाच्या चांगल्या प्रारंभानंतर आपल्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा करीत कमबॅक केले. मला विचाराल तर, तो या निर्णायक कसोटीचा टर्निंग पॉर्इंट होता. अर्धा सामना आम्ही पहिल्याच दिवशी जिंकला होता,’’ असे अजिंक्यने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)>विराट आणि सचिनने मनोबल वाढविले...विराट हा आक्रमक कर्णधार आहे. दुसरीकडे, अजिंक्य हा संयम ढळू न देता शांतपणे कृती करणारा. ‘‘ऐनवेळी कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतर मी काहीसा विचारात असताना खुद्द विराटने तुझ्या पद्धतीने ‘लीड’ कर, असा सल्ला दिला. सचिननेही फोन करून हेच सांगितले. यामुळे आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली,’’ असे अजिंक्यने नमूद केले.>खेळाडू आणि माणूस म्हणून धोनी जबरदस्तभारतीय संघाचा माजी कर्णघार आणि कॅ प्टन कूल हे बिरूद आपल्या वर्तनाने सार्थ ठरवणाऱ्या धोनीची अजिंक्यने मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘‘धोनीसारखा खेळाडू संघात असणे इतर खेळाडूस्ाांठी भाग्याची गोष्ट असते. खेळाडू म्हणून त्याची विचार करण्याची पद्धत शिकण्यासारखी आहे. धोनीचा नुसता वावरदेखील खेळाडूंचे मनोबल वाढविणारा ठरतो. माणूस म्हणनूही तो तितकाच ‘कूल’ आहे.’’>टी-२० वाटतो तितका सोपा प्रकार नाही...२० षटके लवकर संपत असल्याने टी-२० हा प्रकार सोपा आहे, असे नव्हे. या प्रकारात झटपट निर्णय घ्यावे लागतात. खेळपट्टीवर आल्यावर फलंदाजांना लवकरात लवकर परिस्थिती आणि आव्हानांशी जुळवून घ्यावे लागते. यामुळे हा प्रकार वाटतो तितका सोपा नक्कीच नाही, असे मत यावेळी अजिंक्यने मांडले.