शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पुण्याची प्लेआॅफमध्ये धडक

By admin | Updated: May 15, 2017 01:39 IST

यंदाच्या आयपीएलमधील आणीबाणीच्या लढतीत भेदक गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब

विश्वास चरणकर । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाच्या आयपीएलमधील आणीबाणीच्या लढतीत भेदक गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला ९ गडी आणि ४८ चेंडू शिल्लक ठेवून चिरडून टाकत प्लेआॅफच्या फेरीत दुसरे स्थान पटकावले.गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या मैदानावर रविवारी प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने दिलेले ७४ धावांचे आव्हान पुणे संघाने एक गडी गमावत लीलया पेलले. पुण्याची आता मुंबईशी वानखेडेवर क्वालिफायर लढत होईल, तर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बँगलोरमध्ये एलिमिनेटर लढत रंगेल. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकटला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबने गेल्या दोन सामन्यांत धडाक्यात विजय मिळवून अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या, परंतु निर्णायक सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी हाराकिरी केली.पंजाबने दिलेल्या छोट्या टार्गेटचा पाठलागही पुण्याने मोठ्या धुमधडाक्यात केला. अजिंक्य रहाणे व राहुल त्रिपाठी या दोघांनी ५ षटकांत ३६ धावा जोडून जवळपास अर्धा टप्पा पार केला होता. दोघे सलामीवीरच पुण्याला विजय मिळवून देणार, असे वाटत असताना त्रिपाठी अक्षर पटेलला चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्याने २८ धावा केल्या. नंतर आलेल्या स्मिथ व सलामीवीर रहाणे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अजिंक्य ३४ व स्मिथ १५ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पुणे संघाने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले. गुप्टिल आणि साहा यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. पुण्याच्या उनाडकटने पहिल्याच चेंडूवर गुप्टिलला बाद करून पुण्याला यश मिळवून दिले. मनोज तिवारीने कव्हर्समध्ये झेल घेतला. या धक्क्यातून पंजाबला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शॉन मार्शला शार्दुल ठाकुरने दहा धावांवर बाद केले. मार्शचा झेल त्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने घेतला. यानंतर पंजाबला ठराविक अंतराने एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. यामुळे पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले गेले, उनाडकटने राहुलचा व रहाणेने मॅक्सवेलचा झेल घेतला. या वेळी पंजाबची अवस्था ५ बाद ३२ अशी होती. उर्वरित फलंदाजांनी पंजाबची धावसंख्या ७३ वर पोहोचवली.संक्षिप्त धावफलक किंग्ज इलेव्हन पंजाब : मार्टिन गुप्टिल झे. तिवारी गो. उनाडकट ०, वृद्धिमान साहा झे. धोनी गो. ख्रिस्टीयन १३, शॉन मार्श झे. स्मिथ गो. ठाकुर १०, इयान मॉर्गन धावचित (उनाडकट) ४, राहुल तवैटिया झे. उनाडकट गो. ठाकुर ४, ग्लेन मॅक्सवेल झे. रहाणे गो. ठाकुर ०, अक्षर पटेल झे. धोनी गो. ख्रिस्टीयन २२, स्वप्निल सिंग झे. धोनी गो. उनाडकट १०, मोहित शर्मा झे. ख्रिस्टीयन गो. झम्पा ६, इशांत शर्मा झे. स्मिथ गो. झम्पा १, संदीप शर्मा नाबाद ०; एकूण : १५.५ षटकांत सर्व बाद ७३; गोलंदाजी : उनाडकट ३-१-१२-२, ठाकुर ४-०-१९-३, स्टोक्स ३-०-१०-०, झम्पा ३.५-०-२२-२, ख्रिस्टीयन २-०-१०-२.रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे नाबाद ३४, राहुल त्रिपाठी त्रि. गो. पटेल २८, स्टिव्ह स्मिथ नाबाद १५; अवांतर : १, एकूण : १२ षटकांत १ बाद ७८; गोलंदाजी : संदीप शर्मा २-०-१२-०, मोहित शर्मा १-०-६-०, इशांत शर्मा १-०-१२-०, तवैटिया ३-०-१४-०, पटेल २-०-१३-१, स्वप्निल सिंग १-०-६-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-१५-०. आमच्या संघातील युवा भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मी विजयाचे श्रेय त्यांनाच देईन. बँगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून आमचा आत्मविश्वास वाढला. आमची क्वालिफायर लढत मुंबईसारख्या बलाढ्य संघाशी असली तरी या स्पर्धेत आम्ही त्यांना दोन वेळा हरवले असल्यामुळे हा सामना जिंकून आम्ही फायनलमध्ये पोहोचू.- अजिंक्य रहाणेआमच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे आम्ही हरलो. खेळपट्टी मंद असली तरी आम्ही किमान १२०-१३० धावा केल्या असत्या तर सामन्याचे चित्र कदाचित वेगळे दिसले असते. - वीरेंद्र सेहवागअशा होतील प्लेआॅफ लढतीक्वालिफायर-१ १६ मे २०१७ मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंटरात्री ८ वाजता, स्थळ : वानखेडे स्टेडियम,मुंबईएलिमिनेटर १७ मे २०१७ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सरात्री ८ वाजता, स्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर