शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारताला पुजाराचा सहारा, अजूनही 91 धावांची पिछाडी

By admin | Updated: March 18, 2017 17:51 IST

चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 18 - चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा विकेट्स गमावत 360 धावा केल्या आहेत. पुजाराव्यतिरिक्त लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय (82) यांनी अर्धशतक केलं. ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेला युवा गोलंदाज कमिंस कंगारु सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विराट कोहलीसोबत चार विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या. 
 
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डाव्यातील 451 धावांच्या तुलनेत भारत अजूनही 91 धावांनी पिछाडीवर आहे. पुजारासोबत विकेटकीपर रिद्धिमान साहा 18 धावांसह मैदानावर आहे.  तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने सर्वात अगोदर मुरली विजयची विकेट गमावली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (14) आणि विराट कोहलीच्या (6) रुपाने दोन महत्वाचे गडी बाद झाल्याने मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाचा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या शेवट्या सत्रात नायर (23) आणि अश्विन (3) यांची विकेट घेत भारताला अजून दोन झटके दिले. भारताने जेव्हा आपला सहावा गडी गमावला तेव्हा भारत 123 धावांनी पिछाडीवर होता. दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताचा खेळ मंदावला. अंतिम सत्रात भारताने फक्त 57 धावा केल्या. पुजारा मैदानावर अजून खेळत असल्याने भारताच्या आशा कायम आहेत. 
 
याअगोदर भारताने लंचपर्यंत दोन विकेट गमावत 193 धावा केल्या होत्या. दुस-या सत्रात 110 धावा केल्या होत्या. लंचनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून खूप सा-या अपेक्षा होत्या. क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने विराटने मैदान सोडलं होतं. मात्र विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. 
 
अजिंक्य रहाणेने सुरुवात केली तेव्हा लय सापडल्याचं दिसत होतं. मात्र बाऊन्स न समजल्याने मॅथ्यू वेडच्या हाती त्याची विकेट गेली. पुजाराने केलेलं शकत या मालिकेतील भारतीय फलंदाजाचं पहिलं शतक ठरलं आहे.