शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुजारा, कोहली निराशाजनक कालखंडात

By admin | Updated: August 12, 2014 01:29 IST

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले.

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरने निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ मानल्या जाणारे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा इंग्लंड दौऱ्यात त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत निराशाजनक कालखंडातून वाटचाल करीत आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला सलग दोन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याचे मुख्य कारण कोहली व पुजारा यांचा सुमार फॉर्म असल्याचे मानले जात आहे.मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. पुजारा व कोहली यांच्या व्यतिरिक्त मुरली विजय, गौतम गंभीर व अजिंक्य रहाणे यांनी या लढतीत दोन्ही डावांमध्ये केवळ ८९ धावा केल्या. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आघाडीच्या फळीची ही सातव्या क्रमांकाची निराशाजनक कामगिरी आहे.राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीत विश्वासपात्र फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणारा पुजारा यंदा सुरुवातीपासून धावा काढण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्याने गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये अखेरचे शतक झळकाविले होते. हा दिल्लीकर फलंदाज इंग्लंडमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वेलिंग्टनच्या खेळीनंतर कोहलीची कसोटी सरासरी ४६.५१ अशी होती, आता त्यात घसरण झाली असून, ४०.६४ वर आली आहे. कारकिर्दीतील तिसऱ्यांदा त्याची सरासरी ४० पेक्षा कमीवर घसरण्याची शक्यता आहे.द्रविड व लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी पुजारा व कोहली यांच्यावर आली. या दोघांनी त्यानंतर ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. द्रविड-लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर पुजाराने २० सामन्यांत ५६.४५ च्या सरासरीने १७५० धावा फटकाविल्या. त्यात ६ शतकी खेळींचा समावेश आहे. कोहलीने या सर्व २० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ४४.६० च्या सरासरीने १३३८ धावा फटकाविल्या. भारताने या २० पैकी १० सामन्यांत विजय मिळविला तर ६ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पुजाराने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या उपस्थितीत भारताने १२ सामन्यांत विजय मिळविला. त्यात पुजाराने ७४.२५ च्या सरासरीने ११८८ धावा फटकाविल्या. त्याच्या निराशाजनक कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडला. पुजाराच्या उपस्थितीत संघाला ६ वेळा पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)