शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा

By admin | Updated: July 16, 2017 17:16 IST

द्रविड आणि झहीरच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा झालेला सार्वजनिक अपमान असल्याची टीका

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - मुख्य प्रशिक्षक आणि सल्लागारांच्या नियुक्तीवरून भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सुरू झालेला विवाद दर दिवशी नवनवी वळणे घेत आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या सल्लागारपदी झालेल्या नियुक्तीवरून वाद होऊन त्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा झालेला सार्वजनिक अपमान असल्याची टीका बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे माजी सदस्य आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांनी केली आहेत. 
बीसीसीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत रामचंद्र गुहा यांनी ट्विटरवरून परखड भाष्य केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात."सुरुवातीला अनिल कुंबळेचा अपमान करण्यात आला. आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांना अपमानिक करण्यात आले. कुंबळे, द्रविड आणि झहीर हे क्रिकेटचे दूत आहेत आणि त्यांच्यासोबत असे वर्तन होता कामा नये होते." 
रवी शास्त्रीला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर आणि राहुल द्रविड व झहीर खानच्या नियुक्तीला बीसीसीआयकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर गुहा यांनी ही टिप्पणी केली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीत गुहा यांचा समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार कल्चरवर टीका करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.अधिक वाचा
(झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला )(शास्त्री यांच्या वेतन निश्चितीसाठी समिती )( राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही )दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला लाल कंदिल दाखवत, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तूर्तास बासनात गुंडाळून ठेवले होते. सल्लागर समितीकडून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरची नावे सुचवण्यात आली आहेत, पण मुख्य प्रशिक्षिक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे क्रिकेट प्रशासकांच्या समितीने स्पष्ट केले. येत्या 22 जुलैला झहीर आणि राहुल द्रविड संबंधी अंतिम निर्णय होईल.