शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डीचा दिमाखदार ‘पंगा’ सुरू

By admin | Updated: July 19, 2015 01:10 IST

बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी रात्री मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली.

- रोहित नाईक,  मुंबईबॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी रात्री मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली. ‘बिग बी’ महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन प्रो कबड्डी दुसऱ्या सत्राच्या उद्घाट्न कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले.वरळी एनएससीआय स्टेडियमच्या परिसरात शनिवार संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच कबड्डीप्रेमींची गर्दी होऊ लागली. एनएससीआयला प्रो कबड्डीच्या निमित्ताने झालेली गर्दी यामुळे वरळी सीफेस परिसर चांगलाच गजबजला होता. तरुणाईचा या वेळी मोठा उत्साह दिसून आला. नेता, अभिनेता आणि उद्योगपती....प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला या वेळी राजकारणी मंडळींपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी आवर्जून उपस्थिती लावून रंगत निर्माण केली. यामध्ये केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप, भाजपाच्या एन. सी. शायना, महानायक अमिताभ बच्चन, जयपूर संघमालक अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, जया बच्चन, रितेश देशमुख, जेनेलिया डीसूझा, ॠषी कपूर, सुनील शेट्टी, आमिर खान, सोनू सूद, माजी क्रिकेटपटू कपिल देव, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा, मुंबई संघमालक रॉनी स्क्रूवाला यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.मुंबई-पुणे महाराष्ट्राचे डोळे...प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे दोन संघ आहेत. तुमचा पाठिंबा मुंबईला असेल की पुणे संघाला? या कोड्यात पाडणाऱ्या प्रश्नाचे चतुराईने उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हा प्रश्न म्हणजे तुम्हाला डावा डोळा आवडतो की उजवा, असा प्रश्न विचारण्यासारखं. तसेच कबड्डी महाराष्ट्राच्या रक्तात असून, महाराष्ट्राचा हा खेळ अजून पुढे जाईल, असेही फडणवीस म्हणाले.मी इथे कबड्डीच्या प्रसारासाठी आलो आहे. या स्पर्धेद्वारे कबड्डीला नवी ओळख मिळाली असून, कबड्डीला मिळालेला ग्लॅमर खूप महत्त्वाचा आहे. पुढील काही वर्षांत हा खेळ लवकरच जागतिक स्तरावर चमकेल, हा विश्वास आहे.- सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय क्रीडामंत्रीप्रो कबड्डीचे एक वर्ष कसे निघून गेल कळलेच नाही. ज्या ठिकाणी आम्ही विजेतेपद पटकावले होते त्याच ठिकाणी आम्ही आमचा पहिला सामना खेळलो. विजेतेपद राखण्याच्या दृष्टीनेच आम्ही प्रत्येक सामना खेळणार आहोत. प्रो कबड्डीला जो काही प्रतिसाद मिळाला तो अविश्वसनीय होता. - अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर - संघमालक