शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

प्रो कबड्डी : आज मुंबईत लिलावाची चढाई रंगणार

By admin | Updated: May 13, 2016 00:08 IST

तुफान लोकप्रियता मिळवलेल्या प्रो कबड्डीचे चौथे पर्व आगामी जूनपासून सुरु होत असताना त्याआधी मुंबईत खेळाडूंच्या लिलावाच्या निमित्ताने स्पर्धेतील फ्रेंचाईजी संघात मोठी चुरस रंगलेली दिसेल.

चौथ्या पर्वात दिसणार मोठे बदलमुंबई : तुफान लोकप्रियता मिळवलेल्या प्रो कबड्डीचे चौथे पर्व आगामी जूनपासून सुरु होत असताना त्याआधी मुंबईत खेळाडूंच्या लिलावाच्या निमित्ताने स्पर्धेतील फ्रेंचाईजी संघात मोठी चुरस रंगलेली दिसेल. यंदाच्या मोसमापासून स्पर्धा आयोजकांनी प्रत्येक फ्रेंचाईजीला केवळ दोनच खेळाडू आपल्याकडे ठेवण्याबाबत सांगितले असल्याने शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या या लिलावासाठी प्रत्येक संघ कसलेल्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ करतील. विशेष म्हणजे स्पर्धेच्या तिसऱ्या मोसमात खेळलेले सर्व खेळाडू या लिलावासाठी उपलब्ध असल्याने प्रत्येक संघ आपली बाजू भक्कम करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. त्याचबरोबर नवोदित खेळाडूंचाही यावेळी लिलाव होणार असल्याने यंदाच्या मोसमात काही नवे चेहरेही दिसतील. या लिलावासाठी जवळपास २०० खेळाडू उपलब्ध असून एकूण ३ गटात लिलाव होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यानुसार अनुक्रमे १२ लाख, ८ लाख व ५ लाख आधारभूत किंमत असलेल्या तीन गटांत लिलाव होईल. .....................................पाकिस्तान खेळाडूंना होत असलेल्या विरोधाकडे पाहता यंदाही त्यांना खेळण्यासाठी विरोध होऊ शकतो याची कल्पना सर्वच संघांना असल्याने पाक खेळाडूंना लिलावामध्ये सहभागी होता येणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र परदेशी खेळाडूंचा विचार करता इराण आणि कोरिया या देशातील खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे. तसेच पोलंड व थायलंडसह एकूण १२ ते १४ देशांतील कबड्डीपटूंचाही यावेळी लिलावात सहभाग होईल..........................................परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक कोणी चमक दाखवली असेल तर ती आतापर्यंत बंगाल वॉरियर्सकडून खेळलेल्या जँग कुन ली याने. एक कसलेला अष्टपैलू म्हणून छाप पाडताना त्याने अनेकदा बंगालसाठी निर्णायक चढाई व पकडी केल्या आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या दोन सत्रात राखीव राहिलेल्या इराणचा आणि यू मुंबाकडून खेळलेल्या फझल अत्राचलीने तिसऱ्या मोसमात भक्कम पकडी करताना सर्वच प्रतिस्पर्धी चढाईपटूंमध्ये धडकी भरवली होती. त्यामुळेच या दोन परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघ प्रयत्नशील असतील. ........................................संघात कायम राहिले खेळाडू :यू मुंबा : अनुप कुमार व रिशांक देवाडिगापुणेरी पलटण : मनजीत चिल्लर व दीपक हुडाजयपूर पिंक पँथर्स : जसवीर सिंग व राजेश नरवालपटणा पायरेट्स : राजेश मोंडल व प्रदीप नरवालतेलगू टायटन्स : राहूल चौधरी व सुकेश हेगडेदबंग दिल्ली : काशिलिंग आडके व सेल्वामनी के.बंगळुरु बुल्स : आशिष सांगवान व पवन कुमारबंगाल वॉरियर्स : निलेश शिंदे व गिरीश एर्नाक..............................जय-विरु पहिल्यांदाच वेगळे होण्याची संभावनायू मुंबाचे स्टार रिशांक देवाडिगा व विशाल माने ह कबड्डीविश्वातील ‘जय-विरु’ ओळखले जातात. एकाच कॉलेजमधून कबड्डीचे धडे गिरवलेल्या या दोघांनी व्यावसायिक व राष्ट्रीय स्तरावरही कायम एकाच संघातून आपला खेळ दाखवला. शिवाय प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रापासून दोघे यू मुंबाचे आधारस्तंभ राहिले आहेत. मात्र यंदा नव्याने होत असलेल्या लिलावामुळे पहिल्यांदाच विशाल व रिशांक वेगळे होण्याची संभावना आहे. रिशांकला यू मुंबान आपल्याकडे कायम ठेवले आहे. विशालने भक्कम पकडीद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याने त्याच्यासाठी यू मुंबासह इतर संघही प्रयत्नशील असतील. त्यामुळे विशाल कोणत्या संघात जाणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.